जिल्ह्यातील शिक्षकांच्या विविध प्रश्नांसंदर्भात मुख्याध्यापक संघाने आक्रमक पवित्रा घेत प्रश्न निकाली काढण्याची मागणी केली. शिक्षकाचे वेतनाबाबतचे प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत आहे. दर महिन्याच्या एक तारखेला वेतन होणे अनिर्वाय आहे. परंतु वेतन वेळेवर होत नाही. निधीचा अभाव, इतर तांत्रिक बाबी या प्रकारामुळे वेतन होण्यास विलंब होत आहे. फेब्रुवारीचे वेतन अद्याप झाले नाही यामुळे शिक्षकाला मोठ्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. बँकेतील कर्ज प्रकरण व इतर कामे वेतनाअभावी प्रलंबित राहतात. वेतन एक तारखेला व्हावे याबाबत मुख्याध्यापक संघाने वेतन पथकासोबत चर्चा केली.यावेळी वेतन अधीक्षक झापे, वेतन अधिकारी प्रमोद मराठे, इंगोले तसेच मुख्याध्यापक संघाचे जिल्हाध्यक्ष विनोद नरवाडे, उपाध्यक्ष बालासाहेब गोटे, कुलदीप बदर, प्राचार्य संतोष राठोड यांची उपस्थिती होती.
वेतनासंदर्भात मु्ख्याध्यापक संघ आक्रमक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2021 4:37 AM