00
खड्ड्यामुळे वाहनचालकांची गैरसोय
वाशिम : वाशिम-अडोळी या रस्त्यावर खड्डे पडल्याने वाहनचालकांची गैरसोय होत आहे. याकडे संबंधित यंत्रणेने लक्ष देण्याची मागणी वाहनचालकांनी सोमवारी केली.
00
आसेगाव परिसरात आरोग्य तपासणी
वाशिम : आसेगाव, बेलखेडा येथे आणखी प्रत्येकी एक कोरोना रुग्ण रविवारी आढळून आल्याने खबरदारीचा उपाय म्हणून आरोग्य तपासणी करण्यात येत आहे. नागरिकांनी दक्षता घेणे गरजेचे आहे.
०००
रस्त्याच्या कडा भरण्याची मागणी
वाशिम : तामसाळा, देवठाणा फाट्यावरून गावात येणाऱ्या रस्त्याच्या कडा खचल्या आहेत. यामुळे दुचाकी वाहन घसरून अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.
०००००
लक्षणे असल्यास चाचणी करावी
वाशिम : गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे. कोरोना संसर्गाची लक्षणे दिसल्यास त्वरित कोरोना चाचणी करून घ्यावी, असे आवाहन शिक्षण सभापती चक्रधर गोटे यांनी रविवारी केले.
००
प्रकल्प दुरुस्तीसाठी निधीची प्रतीक्षा
वाशिम : रिसोड तालुक्यातील जवळपास लघु प्रकल्पाच्या १४ ते २० गेटची दुरवस्था झाली आहे. या प्रकल्प दुरुस्तीसाठी शासनाकडून अद्याप निधी मिळाला नसल्याचे सांगण्यात येत आहे.
००००
चौकशी करण्याची मागणी
वाशिम : रिसोड तालुक्यातील कुऱ्हा येथील विविध विकासकामांमध्ये गैरव्यवहार केल्याची तक्रार ग्रामस्थांनी पंचायत समितीकडे केली आहे. याबाबत कार्यवाही होत नसल्याने सविस्तर चौकशी करण्याची मागणी नागरिकांनी शुक्रवारी केली.
००
नियमाचे उल्लंघन; चालकावर कारवाई
वाशिम : वाशिम-रिसोड मार्गावरील सिरसाळा, रिठद आदी परिसरात वाहतूक नियम मोडणाऱ्या चालकांवर रविवारी वाशिम ग्रामीण पोलीस स्टेशनच्या पथकाने दंडात्मक कारवाई केली.
.००००
बाधितांच्या संपर्कातील संदिग्धांची तपासणी
वाशिम : मानोरा तालुक्यातील माळेगाव येथे आणखी तीन जणांना कोरोना संसर्ग झाल्याचे रविवारी निष्पन्न झाले. कोरोनाबाधितांच्या संपर्कातील संदिग्ध रुग्णांची माहिती घेणे आणि स्वॅब घेण्याची प्रक्रिया आरोग्य विभागातर्फे सुरू आहे.
००००
ग्रामीण भागात लसीकरण पूर्ववत
वाशिम : ग्रामीण भागात आरोग्यवर्धिनी केंद्रात २४ एप्रिलपासून लसीकरण मोहीम पूर्ववत सुरू झाली असून, ४५ वर्षांवरील नागरिकांना लसीकरणाचा लाभ दिला जात आहे.
00००० पांदण रस्त्याचे काम रखडले
वाशिम : अनसिंग जिल्हा परिषद गटातील अनेक गावांमध्ये पांदण रस्त्याची अवस्था अत्यंत वाईट झाली आहे. पावसाळा सुरू होण्यापूर्वी पालकमंत्री योजनेतून पांदण रस्त्यांचे काम करण्याची मागणी गावातील शेतकऱ्यांनी केली.
००००
दुकानांत फिजिकल डिस्टन्सिंगचा फज्जा
वाशिम : मानोरा, मंगरूळपीर, रिसोड, मालेगाव येथील बाजारपेठेत सकाळच्या वेळी अत्यावश्यक सेवेच्या दुकानांमध्ये गर्दी होत आहे. दुकानांमध्ये फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन होत नाही. कोरोनाचे गांभीर्य ओळखून नागरिक व दुकानदारांनी दुकानांमध्ये फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करणे गरजेचे आहे.
०००
मालेगाव शहरात ६ कोरोना रुग्ण
वाशिम : मालेगाव शहरात आणखी ६ जणांचा कोरोना चाचणी अहवाल २५ एप्रिल रोजी पॉझिटिव्ह आला.कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असल्याने नागरिकांची चिंता वाढली आहे.