पार्डी येथे आरोग्य जनजागृती
वाशिम : पार्डीटकमोर परिसरातही कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे नागरिकांनी कोणती दक्षता घ्यावी, याबाबत आरोग्य विभागातर्फे नागरिकांना मार्गदर्शन करण्यात आले.
नियमांचे उल्लंघन; वाहनांवर कारवाई
वाशिम : दुचाकी, चारचाकी वाहनांची पोलिसांकडून तपासणी केली जात आहे. याअंतर्गत नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर पोलिसांनी बुधवारी कारवाई केली. गेल्या चार दिवसांत १०० पेक्षा अधिक वाहनांवर कारवाई झाली.
भाजीबाजारात गर्दी !
वाशिम : बुधवार, दुपारी सकाळी ८ ते ११ या वेळेत स्थानिक सुंदरवाटिकास्थित भाजीबाजारात नागरिकांची एकच गर्दी झाल्याचे दिसून आले. कुठेही फिजिकल डिस्टन्सिंग नसल्याने कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
नुकसानभरपाईपासून शेतकरी अद्याप वंचित
काजळेश्वर : गतवर्षी ऐन सोयाबीन सोंगणीच्या हंगामात अतिवृष्टी झाल्याने सोयाबीनचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. विमा कंपनीच्या प्रतिनिधींनी नुकसानाचे पंचनामेही केले. मात्र, अद्यापपर्यंत नुकसानभरपाई मिळाली नाही.
एटीडीएम मशीन कार्यान्वित करा
वाशिम : जिल्हाधिकारी कार्यालय, तहसील, बाजार समिती आदी ठिकाणी शेतकऱ्यांची सोय व्हावी, यासाठी एटीडीएम मशीन कार्यान्वित करण्यात आली. मात्र, त्यास नादुरुस्तीचे ग्रहण लागले असल्याचे दिसून येत आहे.
पेरणीपूर्वी बियाणे उगवण क्षमता तपासा
कारंजा : शेतकऱ्यांनी बियाणांची उगवण क्षमता तपासून घ्यावी. ती दमदार असेल, तर पेरणीसाठी ते बियाणे वापरावे, असे आवाहन मंडळ कृषी अधिकारी क्षीरसागर यांनी केले आहे.