०००००
दीड कोटी रुपये खर्च झालेले तारांगण बंद
वाशिम : शहरामध्ये दीड कोटी रुपये खर्च करून बांधण्यात आलेल्या तारांगणाला अद्याप सुरुवात झाली नसून ते बंद आहे. सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने तारांगण बंदच ठेवण्यात येणार आहे.
०००
०००
नवीन रेशन कार्डवर धान्य मिळेना !
वाशिम : मालेगाव तालु्क्यातील नवीन रेशनकार्डधारकांना अद्याप स्वस्त धान्याचा पुरवठा सुरू झाला नाही. स्वस्त धान्य पुरवठा होण्यासाठी शासनाने स्वतंत्र आदेश पारित करावा, अशी मागणी रेशनकार्डधारकांनी सोमवारी केली.
०००००
ब्लिचिंग पावडरचा अनियमित वापर
वाशिम : तोंडगाव परिसरातील काही ग्रामपंचायती जलकुंभात ब्लिचिंग पावडरचा वापर नियमित करीत नसल्याचे दिसून येते. शुद्ध पाणीपुरवठा होण्यासाठी जलस्रोत, जलकुंभातील पाण्यात ब्लिचिंग पावडरचा वापर नियमित होणे गरजेचे आहे.
००
मेडशी परिसरात रिक्त पदांचे ग्रहण
वाशिम : मेडशी जिल्हा परिषद गटातील गावांमध्ये महसूल, पंचायत, शिक्षण, आरोग्य, पशुसंवर्धन यासह विविध विभागांतील कर्मचाऱ्यांची १४ ते १५ पदे रिक्त आहेत. यामुळे कामकाज प्रभावित होत असल्याचे दिसून येते. रिक्त पदे भरण्याची मागणी नागरिकांनी सोमवारी केली.
०००००
शैक्षणिक शुल्कात सवलत देण्याची मागणी
वाशिम : यंदा कोरोनामुळे अध्ययन-अध्यापन प्रक्रिया प्रभावित झालेली आहे. त्यामुळे शाळेतील प्रत्यक्ष शिक्षण बंदच आहे. ऑनलाइन पद्धतीने शिक्षण दिले जात असून, विद्यार्थ्यांकडून शैक्षणिक शुल्क पूर्णपणे वसूल केले जात आहे. यामुळे पालकांमधून नाराजीचा सूर उमटत असल्याचे दिसून येते. शैक्षणिक शुल्कात सवलत देण्याची मागणी पालकांनी शुक्रवारी केली.
०००००
किन्हीराजा येथे आरोग्य जनजागृती
वाशिम : किन्हीराजा परिसरात कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे नागरिकांनी कोणती दक्षता घ्यावी याबाबत आरोग्य विभागातर्फे सोमवारी नागरिकांना मार्गदर्शन करण्यात आले. सर्दी, ताप, खोकला आदी लक्षणे असल्यास चाचणी करण्याचे आवाहन केले.
०००००