०००
प्राथमिक आरोग्य केंद्रातील पदे रिक्त
वाशिम : वाशिम तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयांतर्गत येणाऱ्या काही प्राथमिक आरोग्य केंद्रातील पदे रिक्त असल्यामुळे सेवा पुरविण्यात अडचणी येत आहेत. काही ठिकाणी पुरेसे मनुष्यबळ नसल्याने रिक्त पदे भरण्यात यावीत, अशी मागणी होत आहे.
00
प्रोत्साहन अनुदानाची मागणी
वाशिम : नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना शासनाने प्रोत्साहन अनुदान त्वरित द्यावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी गुरूवारी केली. राज्य शासनाने घोषणेची अंमलबजावणी करावी, अशी मागणी होत आहे.
000
मेडशी येथे आणखी एक कोरोना रुग्ण
वाशिम : मालेगाव तालुक्यातील मेडशी येथे आणखी एक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण १५ एप्रिल रोजी आढळून आला आहे. यापूर्वी मेडशी येथे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. यापूर्वीच्या रुग्णांनी कोरोनावर मात केली. गुरुवारी पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांच्या संपर्कातील इतर संदिग्धांची तपासणी करण्यात आली.
00
दलित वस्ती योजनेची कामे अपूर्ण
वाशिम : केनवड जिल्हा परिषद गटातील काही गावांमध्ये दलित वस्ती सुधार योजनेंतर्गतची कामे अपूर्ण आहेत, तर काही ठिकाणी या कामांची प्रतीक्षा आहे. सिमेंट रस्ते, सामाजिक सभागृह, जलकुंभ आदी सुविधा उपलब्ध करण्याची मागणी नागरिकांनी गुरूवारी केली.
00
रोहयोंतर्गतची कामे अपूर्ण
वाशिम : मालेगाव तालुक्यात महात्मा गांधी ग्रामीण रोजगार योजनेंतर्गतची अनेक कामे अर्धवट आहेत. मजुरांना कामे उपलब्ध व्हावीत म्हणून अर्धवट असलेली कामे सुरू करावीत, अशी मागणी मजुरांनी यापूर्वीही केली होती. तथापि, अद्याप अनेक कामे सुरू करण्यात आली नाहीत.
00
देयक रखडल्याने कंत्राटदार अडचणीत
वाशिम : राज्य शासनाकडे गत दोन वर्षांपासून कोट्यवधींची देयके प्रलंबित असल्याने जिल्ह्यातील कंत्राटदार अडचणीत आले आहेत. याकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी जिल्हा कंत्राटदार संघटनेने धरणे आंदोलनही केले. परंतु काहीच फायदा झाला नाही. देयके देण्याची मागणी होत आहे.
00
वीज पुरवठ्यात वारंवार व्यत्यय
वाशिम : गत काही दिवसांपासून वाशिम शहरासह ग्रामीण भागात विद्यूत पुरवठ्यात वारंवार व्यत्यय निर्माण होत आहे. बुधवारी सायंकाळच्या सुुमारास असाच प्रकार घडल्याने नागरिकांची गैरसोय झाली.
00
समृद्ध गाव स्पर्धेला ‘ब्रेक’
वाशिम : मध्यंतरी समृद्ध गाव स्पर्धेंतर्गत प्रशिक्षणाच्या कार्यक्रमाला जोमात सुरू झाले होते. मात्र, कोरोना विषाणू संसर्गाचे संकट वाढल्यानंतर स्पर्धेला ‘ब्रेक’ लागला असून, प्रशिक्षणही थांबले आहे.
००
एक्स्प्रेस रेल्वेला प्रवासी मिळेना
वाशिम : कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर केवळ आरक्षित पद्धतीने काही एक्स्प्रेस रेल्वे वाशिममार्गे धावत आहेत. मात्र, त्यास प्रवाशीच मिळत नसल्याचे दिसून येत आहे. अनेक आसने यामुळे रिक्त राहात आहेत.