000
जऊळका परिसरात वर्गखोल्या नादुरुस्त
वाशिम : जऊळकासह मालेगाव तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेच्या जवळपास २० वर्गखोल्या नादुरुस्त असल्याने या वर्गखोल्यांची दुरुस्ती पावसाळ्यापूर्वी करण्याची मागणी पालकांनी यापूर्वीही केली होती. अद्याप दुरुस्ती झाली नाही.
००००
अनसिंग परिसरात पाणीटंचाईचे सावट !
वाशिम : उन्हाळ्याला सुरुवात होत नाही; तेच अनसिंग परिसरातील गावांमध्ये पाणीटंचाईचे सावट आहे. नियमित पाणीपुरवठा होत नसल्याने नागरिकांना कृत्रिम पाणीटंचाईला सामोेरे जावे लागत आहे. काहीजण शेतातील विहिरींवरून पाणी आणतात.
०००
तांदळी येथे आणखी ८ कोरोना रुग्ण
वाशिम : वाशिम तालुक्यातील तांदळी शेवई येथे आणखी आठजणांचा कोरोना चाचणी अहवाल १९ एप्रिल रोजी पॉझिटिव्ह आला आहे. नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये, असे आवाहन ग्रामपंचायत प्रशासनाने सोमवारी केले आहे.
००००
खड्डयांमुळे वाहनचालकांची गैरसोय !
वाशिम : मेडशी परिसरातील ग्रामीण भागातील रस्त्यांवरील खड्डयांची डागडुजी अद्याप केली नाही. रस्त्यावरील खड्डयांमुळे वाहनचालकांची गैरसोय होत आहे. संबंधितांनी याकडे लक्ष देणे अपेक्षित आहे.
00000
उंबर्डा येथे एक कोरोना रुग्ण
वाशिम : कारंजा तालुक्यातील उंबर्डाबाजार येथे आणखी एकाचा कोरोना चाचणी अहवाल १९ एप्रिल रोजी पॉझिटिव्ह आला. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन आरोग्य विभागाने सोमवारी केले.
०००००
खड्ड्यांमुळे अपघाताची शक्यता; चालक त्रस्त
वाशिम : वाशिम शहरातील जुना रिसोड नाका, लाखाळाकडे जाणाऱ्या मार्गावर खड्डे पडल्याने अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. जुना रिसोड नाका येथे महामंडळाच्या बसेसला थांबा असून, नेमके याच ठिकाणी खड्डे पडल्याने वाहनचालकांची गैरसोय होत आहे. याकडे संबंधित यंत्रणेने लक्ष देण्याची मागणी वाहनचालकांनी सोमवारी केली.