००००
बियाणे खरेदीसाठी शेतकऱ्यांची गर्दी
वाशिम : खरीप हंगाम तोंडावर आला असून, महाबीजचे सोयाबीन बियाणे खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ सुरू असल्याचे शनिवारी वाशिम शहरात दिसून आले. महाबीजच्या सोयाबीन बियाण्यांचा तुटवडा असल्याने शेतकऱ्यांची गैरसोय होत आहे.
००००
आरोग्य अधिकाऱ्यांकडून लसीकरणाचा आढावा
वाशिम : ग्रामीण भागात लसीकरणाचा टक्का वाढविण्यासाठी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश आहेर यांनी ५ जून रोजी तालुका आरोग्य अधिकाऱ्यांकडून आढावा घेतला. ग्रामीण भागातील नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता कोरोना प्रतिबंधक लस घ्यावी, असे आवाहन डॉ. आहेर यांनी केले.
०००००
ब्लिचिंग पावडरसाठी निधीची तरतूद
वाशिम : पावसाळ्याचे दिवस जवळ येत असल्याने नागरिकांना शुद्ध पाणीपुरवठा करण्यासाठी ग्रामपंचायतींना ब्लिचिंग पावडर खरेदीसाठी पुरेशा प्रमाणात निधीची तरतूद करावी लागणार आहे. शुद्ध पाणीपुरवठा करण्याचे निर्देश जिल्हा परिषद प्रशासनाने दिलेले आहेत.