शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रवादी शरद पवार गटाची तिसरी यादी जाहीर; धनंजय मुंडेंविरोधात 'या' नेत्याला संधी...
2
नवाब मलिकांच्या मुलीविरोधात शरद पवारांची मोठी खेळी; अभिनेत्रीच्या पतीला दिली उमेदवारी
3
निकालानंतर गरज पडली, तर पवारांची मदत घेणार की उद्धव ठाकरेंची?; फडणवीसांनी काय दिले उत्तर?
4
विधानसभा निवडणुकीत भाजपा किती जागा जिंकेल? आकड्याबाबत देवेंद्र फडणवीसांचं सूचक विधान
5
Vidhan Sabha Election : विधानसभा उमेदवारीचा अर्ज किती पानांचा असतो? खर्च किती येतो?; जाणून घ्या सर्व माहिती
6
भाजप कोणत्या विद्यमान आमदारांची तिकिटं कापणार? देवेंद्र फडणवीसांचं पहिल्यांदाच भाष्य
7
अखिलेश यादवांचा 'मविआ'ला इशारा, म्हणाले, "आम्हाला आघाडीत घेतलं नाही, तर..."
8
घाबरण्याची गरज नाही...डिजिटल अरेस्टबाबत पीएम मोदींनी केले जागरुक; सांगितले तीन टप्पे
9
Pushpa 2: १००-२०० नाही तर तब्बल इतके कोटी, 'पुष्पा २'साठी अल्लू अर्जुनने घेतलं तगडं मानधन
10
शिवडीतील नाराजीनाट्य संपलं; अजय चौधरी आणि सुधीर साळवी आले एकत्र
11
'मन की बात' मध्ये पंतप्रधान मोदींनी केला छोटा भीम, मोटू-पतलू अन् हनुमानाचा उल्लेख; काय म्हाणाले?
12
किशोर जोरगेवार यांचा अखेर भाजपामध्ये प्रवेश, विरोध करणाऱ्या सुधीर मुनगंटीवार यांनीच केलं स्वागत
13
जयश्री थोरात यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य, विखे समर्थक वसंतराव देशमुख यांना पुण्यातून घेतले ताब्यात
14
अजित पवार गटाची तिसरी यादी जाहीर; निलेश लंकेंच्या पत्नीविरोधातील उमेदवार ठरला
15
"देश अक्षम्य रेल्वे मंत्र्यांच्या हाताखाली"; वांद्रे टर्मिनसवरील चेंगराचेंगरीनंतर मविआ नेत्यांचा संताप
16
चैतन्याचा उत्सव… दीपावलीचे दिवस आणि मुहूर्त जाणून घ्या...
17
मुंबईतील वांद्रे टर्मिनसवर चेंगराचेंगरी, ९ जण जखमी, दोघांची प्रकृती चिंताजनक
18
‘काहीच उरत नाही’, हीच गरिबांची कहाणी; राहुल गांधींनी शेअर केला व्हिडीओ
19
जुन्नर विधानसभेसाठी समन्वय साधण्याचा प्रयत्न केला, पण एका व्यक्तीमुळे...; अतुल बेनकेंचा कोल्हेंवर आरोप
20
वसंतराव देशमुखांच्या अटकेसाठी पोलीस ठाण्यासमोर आठ तास आंदोलन; जयश्री थोरातांवर गुन्हा दाखल

‘डेल्टा प्लस'बाबत आरोग्य विभाग दक्ष; १०० नमुने तपासणीसाठी दिल्लीला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2021 9:46 AM

Corona Cases in Washim : खबरदारी म्हणून सर्वच मुख्य कोविड केअर सेंटरमध्ये आवश्यक सुविधांची पूर्तता केली जात आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: जिल्ह्यात कोरोना संसर्गाचे प्रमाण नियंत्रणात असले तरी कोरोनाच्या ‘डेल्टा प्लस व्हेरिएंट’बाबत आरोग्य विभाग दक्ष असून, जिल्ह्यातील १०० कोरोनाबाधितांचे नमुने तपासणीसाठी दिल्लीला पाठविण्यात आले आहेत. शिवाय खबरदारी म्हणून सर्वच मुख्य कोविड केअर सेंटरमध्ये आवश्यक सुविधांची पूर्तता केली जात आहे.कोरोनाची दुसरी लाट कमी होत असतानाच कोरोनाचा नवीन विषाणू महाराष्ट्रात सापडला आहे. शास्त्रज्ञांनी त्याला ‘डेल्टा प्लस’ (ए.वाय.-१ व्हेरियंट) नाव दिले आहे. येत्या ६ ते ८ आठवड्यांत कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तवण्यात येत असून, राज्यात डेल्टा प्लसचे २१ रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे केंद्र सरकारनेही राज्याला अलर्ट केले आहे. वाशिम जिल्ह्यातही यावर नियंत्रणासाठी आरोग्य विभागाने तयारी केली आहे. राज्यात कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हेरिएंटने ग्रस्त रुग्णांनी कुठे प्रवास केला, त्यांचे लसीकरण झाले का, कोरोनाची पुन्हा लागण झाली का, ही माहिती राज्य शासनाकडून गोळा केली जात आहे. त्यामुळेच जिल्ह्यात लसीकरणाला वेग देण्यात आला असून, यातील १०० नमुने तपासणीसाठी दिल्लीच्या प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत.  अद्याप त्यांचा अहवाल आरोग्य विभागाला प्राप्त झाला नाही. 

कोरोनाबाधितांच्याच नमुन्यांची चाचणीकोरोना संसर्गाच्या डेल्टा प्लस व्हेरिएंटवर नियंत्रणासाठी शासनाकडून व्यापक उपाययोजना केल्या जात आहेत. त्यात आरोग्य विभागाला विशेष खबरदारी घेण्याचे निर्देश देण्यात आले असून, दर महिन्याला शंभर नमुने दिल्ली येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्याच्या सूचना आहेत. चाचणीत जे व्यक्ती कोरोनाबाधित येतात त्यापैकी निवडक नमुन्यांची चाचणी करण्यासाठी दिल्लीला पाठविले जातात.

अहवालास लागतो महिनाभराचा वेळकोरोनाच्या डेल्टा प्लस व्हेरिएंटची लागण एखाद्याला झाली असेल तर त्याचे नमुने तपासणीसाठी दिल्ली येथील राष्ट्रीय प्रयोगशाळेत पाठवावा लागतात. जिल्हास्तरावर कोरोना चाचणीसाठी संकलित केलेल्या नमुन्यांची तपासणी करून अहवाल प्राप्त झाल्यानंतर काही बाधित व्यक्तींचे नमुने डेल्टा प्लसच्या संसर्गाची खातरजमा करण्याच्या उद्देशाने दिल्लीला पाठविण्यात आले आहेत.

डेल्टा प्लस व्हेरिएंटचे प्रमाण राज्यात नगण्य आहे. त्यातच शासनाने कठोर निर्बंध लागू केले आहेत. त्यामुळे जिल्ह्यात तातडीच्या स्वतंत्र उपाययोजना अद्याप नाहीत. खबरदारी म्हणून दर महिन्याला १०० कोरोनाबाधितांचे नमुने तपासणीसाठी दिल्ली येथील प्रयोगशाळेत पाठविले जात आहेत. गत आठवड्यात हे नमुने पाठविले असून, त्यांचे अहवाल प्राप्त झाले नाहीत.-डॉ. मधुकर राठोड , जिल्हा शल्यचिकित्सक, वाशिम

टॅग्स :washimवाशिमcorona virusकोरोना वायरस बातम्या