लोकमत न्यूज नेटवर्कमालेगाव : कोरोना विषाणू संसर्गाच्या कालावधीतही आरोग्य कर्मचारी उपलब्ध होत नसल्याने, तालुक्यातील कोळगाव येथील आरोग्य उपकेंद्राला कुलूप लावण्याची केविलवाणी वेळ आरोग्य विभागावर आली आहे. सुसज्ज इमारत असतानाही, कर्मचाऱ्यांची नियुक्ती नसल्याने कोळगावचे उपकेंद्र सुरू झाले नाही.आरोग्यविषयक सुविधा म्हणून कोळगाव बु. येथे आरोग्य उपकेंद्र मंजूर झाल्यानंतर दोन वर्षापूर्वी आरोग्य उपकेंद्राचे बांधकाम पूर्ण झाले. आरोग्य उपकेंद्र सुरू न झाल्याने या आरोग्य केंद्र अंतर्गत येणाºया रुग्णांची मोठी गैरसोय होत आहे. सध्या कोरोना विषाणू संसर्गाच्या बाबतीत सर्व जण गंभीर आहेत. शेवटच्या घटकापर्यंत आरोग्य सेवा पोहचविण्यात येत आहे; तर दुसरीकडे कर्मचारी उपलब्ध नसल्याने आरोग्य उपकेंद्राला कुलूप लावण्याची वेळ आरोग्य विभागावर येत आहे. कोळगाव येथील गत अशीच झाली आहे. आरोग्य कर्मचाºयांची नियुक्ती अद्यापही झाली नसल्याने कोळगावचे उपकेंद्र कुलूपबंच आहे.(शहर प्रतिनिधी)कोळगाव येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्राचे बांधकाम पूर्ण झालेले आहे. शासनाची नोकर भरती प्रक्रिया बंद असल्याने येथे कर्मचारी नाहीत. कर्मचारी उपलब्ध होताच, आरोग्य उपकेंद्र सुरू केले जाईल.- डॉ.संतोष बोरसेतालुका आरोग्य अधिकारी, मालेगावमालेगाव तालुक्यातील कोळगाव बु . येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात कर्मचाºयांची नियुक्ती करण्यात यावे अशी मागणी वारंवार जिल्हा परिषदेकडे केलेली आहे. परंतू, याकडे लक्ष द्यायला कुणी तयार नाही. ही गंभीर बाब आहे.- सुनील चंदनशिव, सदस्य, जिल्हा परिषद वाशिम