लोकमत न्यूज नेटवर्कशिरपूर जैन (वाशिम) : गावकºयांच्या मागणीची दखल घेऊन मांगुळझनक प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येत असलेल्या येवता येथील उपकेंद्राची इमारत १.२४ कोटी रुपये खर्चून अखेर उभी झाली; मात्र मुलभूत सुविधा आणि पुरेसे मनुष्यबळ नसल्याने ही इमारत वर्षभरापासून लोकसेवेत कार्यान्वित होऊ शकली नाही. यामुळे आरोग्यविषयक समस्या अद्याप कायम आहेत.मांगुळ झनक प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येत असलेल्या येवता येवता येथे प्रशस्त उपकेंद्राची इमारत असावी, अशी मागणी येवता येथील शांतीपुरी महाराज व गावकºयांनी जिल्ह्यातील राजकीय नेत्यांकडे केली होती. त्याची दखल घेऊन एन.आर.एच.एम.मार्फत येवता येथील उपकेंद्राच्या इमारतीसाठी तब्बल १.२४ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला. त्यातून वर्षभरापूर्वी प्रशस्त दुमजली इमारत उभारण्यात आली. सदर इमारत रुग्णसेवेसाठी तयार असली तरी मनुष्यबळ नसल्याने प्रश्न ‘जैसे थे’ आहे.
येवता येथे उपकेंद्राची प्रशस्त इमारत उभी होऊन एक वर्ष पूर्ण झाले; मात्र ती आजही कुलूपबंद असल्याने परिसरातील रुग्णांना कुठलाच फायदा झाला नाही. याकडे आरोग्य विभागाने लक्ष पुरवून उपकेंद्र कार्यान्वित करायला हवे. - काशिनाथ चोपडे येवता, ता. रिसोड येवता येथील आरोग्य उपकेंद्रासाठी आवश्यक असणारे मनुष्यबळ अद्यापपर्यंत उपलब्ध झालेले नाही. पदे भरण्यास ६ जून २०१९ रोजी मंजूरी मिळाली आहे. भविष्यात होणाºया भरती प्रक्रियेत कर्मचारी मिळाल्यानंतर येवता उपकेंद्रात रुग्णसेवा सुरू होईल. - डॉ. अविनाश आहेरजिल्हा आरोग्य अधिकारी, वाशिम