यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष मधुकरराव राऊत गुरूजी यांनी श्री संत गजानन महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन केले व त्यानंतर पुढील कार्यक्रमास सुरुवात केली. त्यानंतर यशवंत रामराव राऊत यांनी प्राथमिक आरोग्य केंद्र वनोजाच्या कर्मचाऱ्यांनी कोरोना काळात केलेले विविध उपक्रम, आणि केलेल्या कार्याचा उजाळा दिला व सर्वांचे कौतुक केले. आणि सत्कार समारंभास सुरुवात करत प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय काळे, डॉ. गणेश आखाडे, डाॅ. हेमा परळकर, रवी शेगडे, सुजाता इंगोले, आरोग्य सहायक अजय काळे, पद्माताई नेरकर, अनिताताई अंधारे, प्रयोगशाळा अधिकारी विनोद देशपांडे , औषधनिर्माण अधिकारी प्रिया जाधव , आरोग्य सेविका वैशाली खाडे, छाया जोशी, मीरा खेडकर, संगीता इंगोले ,अधिपरिचारिका अंकिता इंगोले ,आरोग्य सेवक सचिन सोळंके, देवेंद्र आडे, काॅम्प्युटर ऑपरेटर लखन राठोड, रुग्णवाहिका चालक संतोष बनसोड, परिचर सखाराम ठाकरे, सुनील पत्रोडिया, माला भगत, संगीता मुळे , गटप्रवर्तक रुपाली इंगोले , स्वच्छता सेवक रंजिता पत्रोडिया या सर्वांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी श्री गजानन महाराज संस्थानचे अध्यक्ष रवींद्र राऊत, माजी अध्यक्ष मनोहर राऊत, उपाध्यक्ष रामेश्वर राऊत, संचालक यशवंत राऊत, सुनंदा राऊत, संजय राऊत, माजी जि. प. सदस्य शिवदास पाटील राऊत, सतीष राऊत, सरपंच डॉ श्रीराम मुखमाले, शांताबाई मुखमाले, गीताबाई राठोड, महादेव ठाकरे , देविसिंग राठोड, निलेश राऊत, गजानन राऊत, गंगादीप राऊत, सचिन राणे, बाळू राऊत, उपस्थित होते.