बँकॉकमधील पाथूमथानी या शहरात दरवर्षी मोठ्या उत्साहाने गणेशोत्सव साजरा करण्यात येतो. तेथे स्थायिक झालेली मराठी कुटुंब दरवर्षी मोठ्या प्रमाणात हा उत्सव साजरा करीत असतात. बँकॉकमधील अनेक जलाशयांकाठी जमलेल्या गणेश भक्तांनी गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या जयघोष करीत गणपतीला निरोप दिला. मंगरुळपीर तालुक्यातील पांगरी महादेव येथील एकनाथ फुलार यांच्यासह अनेक मराठी गणेश भक्तांनी गणेशाचे विसर्जन केले. थायलंड येथील बँकॉक पाथूमथानी शहरातील भारतीय नागरिकांनी यावर्षी जोरदार गणेशोत्सव साजरा केला .येथील भारतीय नागरिकांच्या पुढाकाराने दरवर्षी येथे गणेशोत्सव साजरा केला जातो . भारतीय नागरिक मोठ्या उत्साहाने यात सहभागी होतात. दहा दिवसाच्या या आनंदोत्सव नंतर गणपती बाप्पांना निरोप देण्यात आला. कोरोनाचे सावट असल्याने यंदा सार्वजनिक गणपतीची स्थापना न करता घरगुती गणपती विराजमान करण्यात आले होते. श्री मूर्ती बँगसाई नदीत विसर्जित करण्यात आल्या. यावेळी महाराष्ट्रातील पांगरी महादेव येथील एकनाथ फुलार,
सागर गुंडा पुणे, विक्रम शिंदे, पुणे, इंद्रजीत परोदी पुणे, मितेश सावंत रत्नागिरी, धनंजय बोदले नागपूर हे गणेश भक्त सहकुटुंब सहभागी झाले होते.