शहरं
Join us  
Trending Stories
1
नालासोपाऱ्यात कॅश ड्रामा! पैसे वाटपाच्या आरोपांवरून विनोद तावडेंना घेरले; तीन गुन्हे दाखल
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: सकाळची वेळ नवीन कार्यारंभासाठी अनुकूल!
3
Maharashtra Assembly elections 2024: कोणत्या मुद्द्यांभोवती फिरली प्रचारचक्रे ? 
4
नरेंद्र मोदी, राहुल गांधी, ठाकरे करणार कोथरुडात मतदान; नामसाधर्म्यामुळे प्रशासनाची धावपळ
5
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान; काँग्रेस-भाजपमध्ये लढत 
6
झारखंड : दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; अंतिम टप्प्याचे आज ३८ जागांवर मतदान
7
ज्यांच्या बळावर मतदान, त्यांचाच हिरावला अधिकार; दोन हजार पोलिसांचे बॅलेटच आले नाहीत
8
विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; किती वाजता सुरू होणार मतदान? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच
9
हल्ले, मारहाणीच्या घटनांनी राजकीय वातावरण तापले; प्रचारादरम्यान काय-काय घडलं?
10
३५ हजार पोलिसांचा फौजफाटा मुंबईत सज्ज; चार हजार जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई
11
मुंबईकरांना पहाटेच भाजीपाला पोहोचणार; धान्य, मसाला, फळ मार्केट राहणार बंद
12
वरळीतील १,३३९ मतदारांच्या सोयीसाठी; चक्क उड्डाणपुलाखाली दोन मतदान केंद्रे
13
मतदान शांततेत पार पाडा, जबाबदारी निभावा; पोलिस महासंचालक संजय वर्मा यांचे आवाहन
14
सुप्रिया सुळे, नाना पटोलेंनी बिटकॉइन स्कॅम केला, निवडणुकीत परदेशी चलनाचा वापर; भाजपाचा आरोप
15
डहाणूचा बविआ उमेदवार भाजपात आला, त्याचाच राग ठाकूर पिता-पुत्रांनी काढला? चर्चांना उधाण
16
रोहित पवारांच्या कारखान्यातील अधिकाऱ्याला पैसे वाटताना पकडले; पोलिसात गुन्हा दाखल
17
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?
18
“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास त्याचे खापर विनोद तावडेंवर फोडले जाईल”: पृथ्वीराज चव्हाण
19
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..."
20
Vinod Tawde: त्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप

जिल्ह्यात जोरदार पाऊस; नदी-नाल्यांना पूर

By admin | Published: June 16, 2017 1:48 AM

पेरण्या खोळंबण्याचे संकेत : शेतकरी पुन्हा चिंतातूर!

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्ह्यात गुरुवारी दुपारपासून सर्वदूर जोरदार पाऊस झाला. यामुळे नदी-नाले दुथडी भरून वाहू लागले असून, काही ठिकाणी पूरसदृश स्थिती निर्माण झाली. संततधार स्वरूपातील या पावसामुळे दोन दिवसांपूर्वी सुरू झालेली पेरणीची कामे खोळंबणार असल्याचे संकेत असल्याने शेतकरी चिंतातूर झाले आहेत. गुरुवारी दुपारपासून सुरू झालेल्या पावसामुळे मानोरा तालुक्यातून वाहणारी अरुणावती नदी दुथडी भरून वाहिली. दिग्रस रोडवरील नाल्याला पूर गेल्याने या मार्गावरील वाहतूक बराच वेळ खोळंबली होती. सायंकाळी उशिरा पूर ओसरल्यानंतर वाहतूक सुरळीत झाली. शेलुबाजार (ता. मंगरूळपीर) येथून जवळच असलेल्या शेलुबाजार-शेंदूरजना मोरे रस्त्यावरील खारी नाल्याला मोठा पूर गेला. मालेगाव तालुक्यातील राजुरा, किन्हीराजा, जऊळका रेल्वे येथेही दमदार पाऊस झाल्याने परिसरातील नदी-नाले दुथडी भरून वाहत असून, या पावसामुळे पेरणीची कामे खोळंबणार असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. वाशिम शहरासह तालुक्यातही दुपारपासून सायंकाळी उशिरापर्यंत पाऊस सुरू होता. अनेक गावांमधील वीज पुरवठा खंडितगुरुवारी दुपारनंतर विजांचा कडकडाट आणि सुसाट्याचा वारा सुटून झालेल्या पावसादरम्यान विद्युत वाहिन्या तुटल्याने अनेक गावांमधील विद्युत पुरवठा खंडित झाला होता. किन्हीराजा परिसरातील काही गावांमध्ये रात्री उशिरापर्यंत विद्युत पुरवठा सुरळीत झालेला नव्हता.प्रकल्पांची पाणीपातळी वाढली!बुधवार आणि गुरुवारी झालेल्या जोरदार पावसामुळे जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पांच्या पाणीपातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.