०००
प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत शिकस्त
वाशिम : मानोरा येथील तत्कालीन प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत शिकस्त झाली आहे. मानोरा येथे ग्रामीण रुग्णालय होण्यापूर्वी प्राथमिक आरोग्य केंद्र हे जुन्या इमारतीत सुरू होते. येथे ग्रामीण रुग्णालय सुरू झाले आणि कुपटा येथे प्राथमिक आरोग्य केंद्र हलविण्यात आले. तेव्हापासून ही जुनी इमारत विनावापर आहे.
००
स्मशानभूमींसाठी निधीची प्रतीक्षा
वाशिम : जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत अतिरिक्त निधी मिळाल्यास स्मशानभूमी, ग्रामपंचायत भवनाचा प्रश्न निकाली निघणार होता. मात्र, निधी मिळाला नाही. १५ कोटींचा अतिरिक्त निधी केव्हा मिळणार, याकडे जिल्हावासीयांचे लक्ष लागून आहे.
०००००
ब्लिचिंग पावडरचा अनियमित वापर
वाशिम : पावसाळ्याचे दिवस असतानाही काही ग्रामपंचायती जलकुंभात ब्लिचिंग पावडरचा वापर नियमित करीत नसल्याचे दिसून येते. दूषित पाणीपुरवठा होऊ नये म्हणून पाण्यात ब्लिचिंग पावडरचा नियमित वापर करणे गरजेचे आहे.
००
‘निगराणी समित्यां‘चे प्रशिक्षण रखडले!
वाशिम : कोरोनामुळे स्वच्छ भारत मिशनअंतर्गत कार्यरत निगराणी समितीमधील सदस्यांचे प्रशिक्षण रखडले आहे. कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव कमी होत असल्याने लवकरच प्रशिक्षण होण्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.