वाशिम: सलग चवथ्या दिवशीही कमी-अधिक प्रमाणात जिल्ह्यात पाऊस झाला असून, यामुळे शेतकरी सुखावला आहे. पावसामुळे दिलासा मिळाला, अशा प्रतिक्रिया शेतकºयांमधून उमटत आहेत.यंदा चार लाख हेक्टरवर खरिप पिकाच्या पेरणीचे नियोजन कृषी विभागाने केले. आतापर्यंत ९८ टक्के क्षेत्रावर पेरणी आटोपली आहे. यंदा सर्वाधिक पेरा सोयाबीनचा झाला आहे. त्याखालोखाल तूर, कपाशी, मूग, उडीद आदी पिकांचा पेरा आहे. गेल्या वर्षीदेखील पेरणीनंतर पावसात सातत्य नसल्याने शेतकºयांना नैसर्गिक आपत्तीला सामोरे जावे लागले होते.यंदाही पेरणी आटोपल्यानंतर जवळपास १० ते १२ दिवस पावसाने दडी मारली होती. त्यानंतर अधूनमधून पाऊस झाल्याने पिकांना संजीवणी मिळत गेली. गत चार दिवसांपासून जिल्ह्यात कमी-अधिक प्रमाणात पाऊस पडत असल्याने पिकांना चांगलीच संजीवणी मिळत आहे. नदीकाठच्या शेतात पाणी साचत असल्याने काही शेतकºयांना पीक नुकसानादेखील सामोरे जावे लागत आहे. नुकसानग्रस्त भागाचे सर्वेक्षण करण्याची मागणी शेतकºयांमधून होत आहे. पिकांची वाढ जोमाने होणार !गत चार दिवसांपासून जिल्ह्यातील अनेक भागात कमी अधिक प्रमाणात पाऊस पडत असल्याने पिकांना संजीवणी मिळाली; यासोबत पिकांची वाढ जोमाने होण्याचा आशावाद शेतकºयांमधून व्यक्त होत आहे.
वाशिम जिल्ह्यात चवथ्या दिवशीही संततधार पाऊस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 5:21 PM