लोकमत न्यूज नेटवर्कशिरपूर जैन : रिसोडकडून मालेगावकडे भरधाव वेगाने जात असलेल्या पिकअप वाहनाने दुचाकीला मागून जबर धडक दिली. या अपघातात लोणी, ता. रिसोड येथील ग्यानुजी लोडूजी घायाळ (शावकार) हे जागीच ठार झाले; तर गंधारी, ता. लोणार येथील शिवाजी रुपचंद राठोड हे गंभीर जखमी झाले. अपघातास कारणीभूत ठरलेल्या पिकअप वाहनाने पुढे जाऊन भाजीपाला वाहतूक करणाºया आॅटोलाही जबर धडक दिली. हा अपघात १६ फेब्रूवारी रोजी घडला.प्राप्त माहितीनुसार, मृतक ग्यानुजी घायाळ व शिवाजी राठोड हे विनाक्रमांकाच्या दुचाकी वाहनाने रिसोडवरून मालेगावकड चालले होते. यादरम्यान मजूर घेऊन मागून येणाºया पिकअप (क्रमांक- एम.पी. ३६ जी ०८०२) वाहनाने दुचाकीस जबर धडक दिली. यात ग्यानुजी घायाळ यांच्या मेंदूला मार लागल्याने ते जागीच ठार झाले; तर शिवाजी राठोड हे जखमी झाले. या अपघातानंतर न थांबता पिकअप वाहनचालकाने आपले वाहन शिरपूरमध्ये घुसवून भाजीपाला घेऊन जाणाºया एका आॅटोला धडक दिली. आॅटो उलटल्याने भाजीपाल्याचे नुकसान झाले. दरम्यान, गावातील देशमुख गल्ली येथे उपस्थित संभाजी नवयुवक मंडळाच्या कार्यकर्त्यांनी अपघातास कारणीभूत ठरलेले वाहन थांबविले व चालकास पोलिसांच्या ताब्यात दिले.
रुग्णवाहिकेच्या चालकांचा मृतदेह उचलण्यास नकार
अपघात घडल्यानंतर शिरपूर आरोग्यर्धिनी केंद्राची रुग्णवाहिका व १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेस घटनास्थळी पाचारण करण्यात आले; मात्र दोन्ही रुग्णवाहिकेच्या चालकांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी नेण्याकरिता नकार दिला. त्यामुळे उपस्थित नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त झाला. अखेर आरोग्यवर्धिनी केंद्राच्या रुग्णवाहिकेव्दारे मृतदेह मालेगावला हलविण्यात आला. ही बाब लक्षात घेता किमान तालुकास्तराव स्वतंत्र शववाहिका उपलब्ध करावी, असे मत सामाजिक कार्यकर्ते संतोष भालेराव यांनी व्यक्त केले.