राजूरा : मालेगाव तालुक्यातील टँकरग्रस्त गाव म्हणून शासनदरबारी नोंद असलेल्या राजूरा येथे सद्यस्थितीत भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे.गावातील भीषण पाणीटंचाई लक्षात घेता प्रशासनातर्फे मार्च महिना उजाडन्यापुर्वीच टँकरव्दारा पाणी पुरवठा करण्यात येतो. मात्र यावर्षी एप्रिल महिना संपत आला तरी टँकरचा थांगपत्ता नाही. तीन हजारावर लोकसंख्या असलेल्या राजूरा येथील ग्रामस्थांची तहान भागविणारे सार्वजनिक व खासगी पाणवठे व कुपनलिकांनी उन्हाळयाची चाहूल लागण्यापुर्वीच दम तोडला. त्यामुळे ग्रामस्थांना मिळेल त्या ठिकाणावरुन पाण्याच्या शोधात भटकंती करावी लागत आहे. पाणीटंचाईची एवढी गंभीर समस्या असताना मात्र गाव परिसरात जलपुनर्भरणच्या कोणत्याच ठोस उपाययोजना राबविल्या जात नाहीत. जलसंपदा विभागाचे वतीने परिसरात अनेकदा सर्व्हेक्षण झाले. मात्र ते सर्वेक्षण कागदापुढे सरकू शकले नाही. बालकांपासून वयोवृद्ध नागरिकांना डोक्यावर हंडा, कळशी घागर घेऊन पाणी आणण्याची वेळ आली आहे.
राजुरा येथे भीषण पाणीटंचाई
By admin | Published: April 25, 2017 7:54 PM