कृषीमंत्र्यांचे तात्काळ सर्व्हेक्षण करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांना आदेश!वाशिम : दिनांक १६ मार्च रोजी वाशिम जिल्हयातील कारंजा, मानोरा, मंगरुळपीरसह इतर गावामध्ये अवकाळी पाऊस व गारपीटीमुळे परिसरातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. याबाबत कारंजा मानोरा विधानसभा मतदार संघाचे आमदार राजेंद्र पाटणी यांनी १७ मार्च रोजी कृषीमंत्री पांडूरंग फुंडकर यांची भेट घेवून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतीचे सर्व्हेक्षण करुन तात्काळ मदत देण्याची विनंती केली. यावर कृषी मंत्री मा.ना.पांडूरंगजी फुडकर यांनी तात्काळ जिल्हाधिकारी वाशिम यांना नुकसानग्रस्त शेतीचे सर्व्हेक्षण करुन सादर करण्याचे निर्देश दिले. १६ मार्च रोजी जिल्हयातील कारंजा, मानोरा, मंगरुळपीर सह इतर गावात अवकाळी पाउस व गारपीटने मोठे थैमान घातले. यामध्ये संत्रा, अंबा, हरभरा, गहू, कांदा व भाजीपाल्याचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांवर मोठे आर्थिक संकट कोसळले असून सदर बाब कृषी मंत्री फुंडकर यांच्या निदर्शनास आमदार राजेंद्र पाटणी यांनी आणून दिली. यावर लवकरच नुकसानग्रस्त शेतीचे सर्व्हेक्षण करुन शेतकऱ्यांना आर्थिक मदत उपलब्ध होईल. अशी ग्वाही सुध्दा कृषी मंत्री पांडूरंग फुंडकर यांनी आमदार राजेंद्र पाटणी यांना दिली.
अवकाळी पाउस व गारपीट ग्रस्त शेतकºयांच्या पिकांचे सर्वेक्षण त्वरित करुन मदत करा
By admin | Published: March 17, 2017 1:37 PM