लाेकमतने यासंदर्भात २० जून राेजी सविस्तर वृत्त प्रकाशित केले हाेते. सेवानिवृत्त शिक्षक द्वारकादास गुडगिल्ला यांनी सेवानिवृत्ती नंतर पिठाची गिरणी सुरू करून व्यवसाय चालवितात. कोरोना महामारीमुळे सर्वत्र लॉकडाऊन काळात या नेत्रहीन मुलांचा संगीत कार्यक्रम बंद पडला. परिणामी उदरनिर्वाहची समस्या निर्माण झाली. चेतन सेवांकुरच्या नेत्रहीन मुलांची बातमी लोकमतने प्रकाशित केल्यानंतर सदर बातमीची दखल घेऊन पीठ गिरणी मालक गुडगिल्ला यांनी या मुलांना रोख आर्थिक मदत देण्याचे ठरविले. द्वारकादास गुडगिल्ला व त्यांचे मित्र नंदू कोराने हे दोघे चेतन सेवांकुर निवासस्थानी पोहोचून वीस हजार रुपयांची रोख आर्थिक मदत तसेच फराळ या नेत्रहीन मुलांना दिला. याप्रसंगी मातोश्री गयाबाई उचितकर,पांडुरंग उचितकर, गंगासागर उचितकर,चेतना उचितकर आदी उपस्थित होते.
हलाखीच्या परिस्थितीतही १५ अंधांचे पितृत्व स्वीकारणाऱ्या पांडुरंगास मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 01, 2021 4:27 AM