शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
3
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
4
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
5
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
6
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
7
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
8
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
9
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

दहाव्या मिनिटाला मिळणार मदत; आता डायल करा ११२

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2021 4:45 AM

वाशिम : स्वत:वर होत असलेला अन्याय, सभोवताल घडत असलेल्या अनुचित प्रकारांची माहिती तात्काळ पोलिसांपर्यंत पोहचण्यासाठी आता एकमेव ११२ हा ...

वाशिम : स्वत:वर होत असलेला अन्याय, सभोवताल घडत असलेल्या अनुचित प्रकारांची माहिती तात्काळ पोलिसांपर्यंत पोहचण्यासाठी आता एकमेव ११२ हा हेल्पलाईन क्रमांक कार्यान्वित करण्यात आला आहे. तो १६ सप्टेंबरपासून सेवेत रुजू झाला आहे. हा नंबर डायल केल्यानंतर अवघ्या दहाव्या मिनिटाला पोलीस घटनास्थळी हजर होतील, असे नियोजन करण्यात आले असून, त्यासाठी २५ इमर्जन्सी रिस्पाॅन्स व्हेईकल सज्ज करण्यात आल्या आहेत. या वाहनांवर माेबाइल डाटा टर्मिनल जीपीएस ट्रॅकिंग डिव्हाईस यंत्रणा २४ तास कार्यरत राहणार आहे.

जिल्ह्यात एकूण १३ पोलीस ठाणी आहेत. त्यात ९२ अधिकारी व १३९८ अंमलदार कार्यरत आहेत. दरम्यान, या पोलीस ठाण्यांच्या कार्यक्षेत्रातील नागरिकांना आपत्कालीन परिस्थितीमध्ये तात्काळ मदत हवी असल्यास त्यांना आता ११२ हा हेल्पलाईन क्रमांक डायल करावा लागणार आहे. विशिष्ट यंत्रणेच्या साहाय्याने एका ठिकाणी फोन लावल्यावर अवघ्या काही सेकंदात हा फोन कोठून आला, हे संबंधित पोलीस कर्मचाऱ्यांना कळणार आहे. त्यानंतर तेथील पोलीस नियंत्रण कक्ष, अग्निशमन दल, महिला हेल्पलाईन, चाईल्ड हेल्पलाईन यांना एकाचवेळी त्या कॉलची माहिती दिली जाणार आहे. जेणेकरून घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन आवश्यकतेनुसार सर्व यंत्रणा घटनास्थळी दाखल होऊ शकतील.

आपत्कालीन प्रतिसाद साहाय्य प्रणाली (ईआरएसएस) निर्मितीचा निर्णय घेण्यात आला असून या प्रकल्पास वाशिम जिल्ह्यात १६ सप्टेंबरपासून सुरूवात झाली. नागरिकांना आता १०० ऐवजी ११२ या क्रमांकावर पोलिसांकडून मदत मागावी लागणार आहे, हे विशेष

......................

काॅलचे लोकेशन कळणार तात्काळ

नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी, कुठलीही घटना घडल्यास पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहोचावेत, यासाठी ११२ हा हेल्पलाईन क्रमांक १६ सप्टेंबरपासून कार्यान्वित करण्यात आला. या क्रमांकावरून काॅल येताच विशेष यंत्रणेच्या मदतीने व वाहनांवरील जीपीएसच्या साहाय्याने काॅल नेमका कोठून आला, याचे लोकेशन कळविण्याची व्यवस्था उभी करण्यात आली. त्यामुळे पोलीस घटनास्थळी उशिरा पोहोचणे, आरोपी फरार होणे यासह इतरही बाबींना आळा बसणार आहे.

..............

४० पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांना विशेष प्रशिक्षण

राज्यातील इतर जिल्ह्यांसह वाशिम जिल्ह्याचेही सध्या ‘जिओ टॅगिंग’ केले जात आहे. त्याचबरोबर ‘सेंट्रलाईज कंट्रोल रूम’ला फोन आल्यावर कशाप्रकारे प्रतिसाद द्यायचा, स्थानिक कंट्रोल रूमला फोन आल्यावर काय प्रक्रिया राबवायची, याबाबतची प्रशिक्षण प्रणाली निश्चित करण्यात आली आहे. त्याचे प्रशिक्षण कर्मचाऱ्यांना देण्यात आले आहे. वाशिम जिल्हा पोलीस दलातील एकूण ४० पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे.

.................

कोट :

राज्यातील अन्य जिल्ह्यांप्रमाणेच वाशिम जिल्हा पोलीस दलातही आता ११२ हेल्पलाईन क्रमांक कार्यान्वित करण्यात आलेला आहे. यापुढे जिल्ह्यात कुठेही आणि कुठल्याही प्रकारची अनुचित घटना घडल्यास त्याठिकाणी पोलीस तात्काळ पोहोचावेत, यासाठी ११२ हा हेल्पलाईन नंबरवर नागरिकांनी मदतीसाठी संपर्क साधावा. पुढील ९ ते १० मिनिटांत पोलीस मदतीसाठी हजर होतील.

- वसंत परदेशी, जिल्हा पोलीस अधीक्षक, वाशिम