लोकमत न्यूज नेटवर्क मालेगाव : तालुक्यासह वाशिम जिल्ह्यातील ४६ गावांत ‘हाय मास्ट’ दिवे लावले जाणार आहेत. धनगर समाज संघर्ष समितीच्यावतीने खासदार डॉ. विकास महात्मे यांच्याकडे ही मागणी करण्यात आली होती. त्यानुसार खासदार महात्मे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठवून या संदर्भात निधी उपलब्ध करून देण्याच्या सुचना केल्या आहेत. वाशिम धनगर समाज संघर्ष समितीचे जिल्हाध्यक्ष महादेव लांभाडे, यांच्या नेतृत्वात, मालेगावचे नगर सेवक बाळूभाऊ मुरकुटे, सरपंच बबनराव मिटकरी, जि.प. सदस्य किसनराव मस्के यांच्या प्रयत्नाने डॉ विकास महात्मे यांच्याकडे ही मागणी करण्यात आली होती. त्या मागणीची दखल खासदार डॉ. विकास महात्मे यांनी घेतली आणि या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठवून खासदार स्थानिक विकास कार्यक्रम २०१८-१९ अंतर्गत जिल्ह्यातील ४७ गावांत ‘हाय मास्ट’ दिवे लावण्याच्या कामांस प्रशासकीय मंजुरी देऊन निधी उपलब्ध करून देण्याच्या सुचना केल्या आहेत. या अंतर्गत मालेगाव तालुक्यात ढोरखेडा कोळगाव बोराळा कुरळा जऊळका अनसिंग चिवरा करंजी राजुरा राव, त्याशिवाय जिल्ह्यातील वारा जहागीर, वाई वारला, वाकद, जोगेश्वरी, वाशिम शहर, सवड, पेनबोरी, बिबखेडा, मसलापेन, येवता, देऊळगाव बंडा, पार्डी टकमोर, पार्टी ताड, गोगरी, पेडगाव, उकळी पेन, शेलू बाजार, वनोजा, कंझरा, गोगरी आदि ठिकाणी हे हाय मास्ट दिवे लावण्यात येणार आहे. येत्या २ महिन्यांत उपरोक्त गावांत धनगर समाज संघर्ष समितीच्या पदाधिकाºयांच्या हस्ते, नगर सेवक बाळूभाऊ मुरकुटे, किसनराव मस्के, बबनराव मिटकरी,डॉ .खरात साहेब विदर्भ सहसचिव धनगर समाज संघर्ष समिती बोरकर सर,विलासभाऊ लांभाडे, रविभाऊ लांभाडे यांच्या उपस्थितीत हे दिवे लावण्यात येतीलअशी माहिती बबनराव मिटकरी यांनी दिली आहे.
वाशिम जिल्ह्यातील ४६ गावांत होणार ‘हाय मास्ट’चा लखलखाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2018 2:00 PM