लोकमत न्यूज नेटवर्ककिन्हीराजा : मालेगाव तालुक्यातील किन्हीराजा येथे गेल्या पाच ते सहा दिवसापासून जादा दाबाचा वीजपुरवठा झाल्याने अनेकांच्या घरातील विद्युत उपकरणे जळाली आहेत. ग्रामपंचायतचे १६ पथदिव्यांचादेखील यामध्ये समावेश आहे.किन्हीराजा येथे गेल्या सहा दिवसापासून वीजेची समस्या मोठ्या प्रमाणात वाढली असून वारंवार बिघाड होत आहे. वसंतराव नाईक आश्रम शाळा येथील वीज पुरवठा गेल्या तीन दिवसांपासून बंद असून बसस्टॉप परीसरातील पाच ते सात छोट्या व्यापाऱ्यांचा वीजपुरवठाही बंद आहे. त्यामुळे या व्यापाऱ्यांना आपली प्रतिष्ठाने संध्याकाळी लवकर बंद करावी लागत आहे. बसस्थानक परिसर व वसंतराव नाईक आश्रम शाळा परीसरात दोन तीन दिवसांपासून अंधारच आहे.१२ सप्टेंबर रोजी सकाळी किन्हीराजा परीसरात ग्रामपंचायत कार्यालयासमोरील रोहीञावरुन अचानक वीजपुरवठा कमी-जास्त झाल्यामुळे ग्रापंचायतने लावलेली १६ पथदिवे जळाले, अशी माहिती ग्रामपंचायतचे लीपीक मुरलीधर धन्तुरे यांनी दिली आहे. २८०० रुपये किंमतीचा एक पथदिवा असून, यामुळे ग्रामपंचायतचे ४४ हजार ८०० रुपयांचे नुकसान झाले. गावातील अनेक वीज ग्राहकांचे एल इ डी लाईट, टीव्ही, एल सीडी, इर्न्वटर फ्रीज, सह अनेक विद्युत उपकरणे व साहीत्य जळाल्याने ग्राहकांचे नुकसान झाले. या वीज ग्राहकांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी नुकसानग्रस्त वीज ग्राहकांनी केली.यासंदर्भात महावितरणचे मालेगाव येथील उपअभियंता जीवनानी म्हणाले की, किन्हीराजा येथील ग्रामपंचायत कार्यालय परीसरातील रोहीञातून अचानक वीज प्रवाह कमी-जास्त झाल्याने विद्युत उपकरणे जळाली, अशी माहिती मिळाली आहे. रोहीञात अचानक बिघाड झाला की केबल तुटला की वीज तारांवर आकोडे टाकल्याने हा प्रकार घडला याची माहिती घेतली जाईल. विजेचा दाब कमी-जास्त झाल्यामुळे वीज ग्राहकांचे ५० ते ६० हजार रुपयांचे नुकसान झाले, अशी माहिती युवराज सरदार यांनी दिली. दोन तीन दिवसांपासून बसस्टॉप जवळील व आश्रम शाळा परीसरातील वीज पुरवठा बंद असल्याने खुप ञास होत असल्याची माहीती शाळेचे शिपाई खिल्लारे व बसस्थानक परीसरातील हॉटेल चालक पींटू खुरसडे यांनी दिली. (वार्ताहर)
जादा दाबाचा विद्युत पुरवठा; उपकरणे जळाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2019 14:57 IST