शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
2
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
3
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
4
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
5
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
6
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
7
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
8
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
9
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
10
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
11
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
12
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
13
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...
14
IPL Auction 2025: युजवेंद्र चहलला १७७ % 'अप्रेझल'! बनला सर्वात महागडा स्पिनर, पंजाब किंग्जने घेतलं संघात
15
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन
16
TATA IPL Auction 2025 Live: इशान किशन हैदराबादच्या ताफ्यात; SRH ने लावली 11.25 कोटींची बोली...
17
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!
18
विधानसभा संपल्या, आता विधान परिषदेवर लक्ष; महायुतीच्या कोणत्या 6 नेत्यांना लागणार लॉटरी?
19
बनावट ASP बनून फिरली, पोलिसांनी केलं सॅल्यूट; एक छोटीशी चूक होताच झाली पोलखोल
20
"नियोजनाप्रमाणे प्रचार केला नाही"; काँग्रेस नेत्याने शरद पवार-ठाकरेंवर फोडलं पराभवाचे खापर

महसूल, पोलीस खात्यात लाचखोरांचे प्रमाण अधिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2021 12:15 PM

Washim News दोन वर्षांत लाच स्वीकारताना १० पोलीस, तर आठ महसूल कर्मचारी जेरबंद करण्यात आले.

वाशिम : येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने २०१९ व २०२० या दोन वर्षांत व चालू वर्षात आतापर्यंत लाच स्वीकारल्याप्रकरणी एकूण ४० कारवाया केल्या. त्यात महसूल व पोलीस खात्यातच लाचखोरांचे प्रमाण अधिक असल्याचे दिसून येत आहे. दोन वर्षांत लाच स्वीकारताना १० पोलीस, तर आठ महसूल कर्मचारी जेरबंद करण्यात आले.प्रशासन भ्रष्टाचारमुक्त व्हावे, यासाठी शासनस्तरावरून प्रयत्न केले जात आहेत. याशिवाय लाचलुचपत प्रतिबंधक विभागही भ्रष्ट अधिकारी, कर्मचाऱ्यांवर ‘वॉच’ ठेऊन आहे. असे असताना २०१९ ते २०२१ या कालावधीत जिल्ह्यातील प्रशासकीय विभागात भ्रष्टाचार झाल्याची ४० प्रकरणे उघडकीस आली, तर ३० प्रकरणांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले. यामध्ये सर्वाधिक प्रमाण हे पोलीस व महसूल खात्यातीलच आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागास तक्रार करणाऱ्यांची 

३१ ते ४० मधील कर्मचाऱ्यांना पैशाचा मोह आवरेना लाच स्वीकारणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या वयोगटानुसार वर्गीकरण केले असता, ३१ ते ४० या वयोगटांतील कर्मचाऱ्यांचाच त्यात अधिक भरणा असल्याचे दिसून येत आहे. २०१९ ते २०२१ या कालावधीत या वयोगटातील १४ कर्मचाऱ्यांनी पैशाच्या मोहाला बळी पडून लाच स्वीकारली. संबंधितांवर ‘अ‍ॅन्टी करप्शन ब्युरो’कडून कारवाई करण्यात आली.२०१९ मध्ये ४ पोलीस कर्मचारी, १ महसूल कर्मचारी, १ न.प. कर्मचारी, १ भूमी अभिलेख, २ नगरपंचायत, ३ शिक्षण विभाग, २ कृषी विभाग, २ ऊर्जा विभाग व ३ खासगी/इतर लोकसेवकांना लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले. २०२० मध्ये ७ महसूल कर्मचाऱ्यांनी लाच स्वीकारल्याचे निष्पन्न झाले. पोलीस विभागातील ६ कर्मचारी, ऊर्जा, सहकार व पंचायत विभागातील प्रत्येकी एका कर्मचाऱ्यास या प्रकरणी जेरबंद करण्यात आले, तर २०२१ मध्ये ग्रामविकास आणि पंचायत विभागातील कर्मचाऱ्यावर कारवाई करण्यात आली.

 

लाचलुचपत प्रतिबंधक विभागास तक्रार करणाऱ्यांची नावे गोपनीय ठेवली जातात. तक्रार प्राप्त झाल्यानंतर सापळा रचून २०१९ ते २०२१ या कालावधीत एकूण ४० कारवाया करण्यात आल्या. सखोल तपासाअंती त्यातील ३० प्रकरणांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. नागरिकांनी कुठलीही भीती न बाळगता लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल करावी. तत्काळ दखल घेतली जाईल.- निवृत्ती बोराडे, लाचलुचपत विभाग, वाशिम

टॅग्स :washimवाशिमAnti Corruption Bureauलाचलुचपत प्रतिबंधक विभागBribe Caseलाच प्रकरणPoliceपोलिसRevenue Departmentमहसूल विभाग