शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
2
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
3
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
4
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
5
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
6
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
7
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
8
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
9
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
10
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
11
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
12
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
13
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
14
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
15
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान
16
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
17
अपघातानंतर पहिल्यांदाच कश्मिरा शाहने शेअर केला Video; नाकाला झालेली दुखापत
18
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
19
Neha Bhasin : "अंधाऱ्या खोलीत बसते, माझं वजन १० किलोने वाढलं"; नेहा भसीन देतेय गंभीर आजाराशी झुंज
20
OLA चा धमाका! लॉन्च केली नवीन EV स्कूटर रेंज; किंमत फक्त ₹39,999 पासून सुरू...

मानोऱ्यात सर्वाधिक तर वाशिम तालुक्यातील प्रकल्पांत सर्वांत कमी जलसाठा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2021 4:25 AM

वाशिम : गत १० दिवसांपासून कमी-अधिक प्रमाणात पाऊस बरसत असल्याने प्रकल्पांतील जलसाठ्यांतही वाढ होत आहे. मानोरा तालुक्यातील २५ प्रकल्पांत ...

वाशिम : गत १० दिवसांपासून कमी-अधिक प्रमाणात पाऊस बरसत असल्याने प्रकल्पांतील जलसाठ्यांतही वाढ होत आहे. मानोरा तालुक्यातील २५ प्रकल्पांत सर्वाधिक सरासरी ६५ टक्के तर वाशिम तालुक्यातील ३६ प्रकल्पांत सर्वांत कमी ११ टक्के जलसाठा झाला आहे.

यंदा जूनच्या अखेरीस आणि जुलै महिन्याच्या सुरुवातीला पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली होती. दुसरीकडे प्रकल्पातदेखील समाधानकारक जलसाठा नव्हता. गत १० दिवसांपासून जिल्ह्यात कमी-अधिक प्रमाणात संततधार पाऊस पडत आहे. त्यामुळे प्रकल्पांतील जलसाठ्यांतही वाढ होत असल्याचे दिसून येते. जिल्ह्यात पाटबंधारे विभागांतर्गत तीन मध्यम आणि १३४ लघू प्रकल्प असे एकूण १३७ प्रकल्प आहेत. सर्वाधिक प्रकल्प वाशिम तालुक्यात ३७ तर सर्वांत कमी प्रकल्प मंगरूळपीर तालुक्यात १५ आहेत. १३४ लघू प्रकल्पांत सरासरी ३७.०७ टक्के जलसाठा झाला तर तीन मध्यम प्रकल्पांत सरासरी ५३.०३ टक्के जलसाठा झाला आहे. वाशिम तालुक्यातील ३६ लघू प्रकल्पांत सरासरी ११.८४ टक्के तर मानोरा तालुक्यातील २५ प्रकल्पांत सरासरी ६५.०८ टक्के जलसाठा झाला आहे. रिसोड व वाशिम तालुक्यातील प्रकल्प अजून तहानलेलेच असल्याचे दिसून येते. प्रकल्प परिसरात दमदार पाऊस झाला नसल्याने या दोन्ही तालुक्यांतील प्रकल्पांत सरासरी २० टक्क्यांपेक्षा कमी जलसाठा आहे.

००००

असा आहे लघू प्रकल्पांतील जलसाठा

तालुकाप्रकल्प टक्केवारी

वाशिम ३६ ११.८४

मालेगाव २३ ४९.७०

रिसोड १९ १८.६५

मंगरूळपीर १५ ४८.१७

मानोरा २५ ६५.०८

कारंजा १६ ४९.८५

एकूण १३४ ३७.०७

०००

मध्यम प्रकल्पांतील जलसाठा

एकबुर्जी ६७.७५

सोनल ४२.०८

अडान ५३.१६

०००

बॉक्स

वाशिमकर निश्चिंत

वाशिम शहरात पाणीपुरवठा करणाऱ्या एकबुर्जी या मध्यम प्रकल्पांत सद्य:स्थितीत ६७.७५ टक्के जलसाठा झाला आहे. पावसाची रिपरिप सुरू असल्याने लवकरच हा प्रकल्प ओव्हरफ्लो होण्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. हा प्रकल्प १०० टक्के भरला तर उन्हाळ्यापर्यंत शहरवासीयांना फारशी पाणीटंचाई जाणवत नाही.

०००००००००००