लोकमत न्यूज नेटवर्कजोगलदरी (वाशिम) : राष्ट्रीय महामार्गाचे कंत्राट घेणाºया कंपनीने साहित्य ठेवण्यासह कामगारांच्या वास्तव्यासाठी ई-क्लास जमिनीवरच अतिक्रमण केले आहे. जोगलदरीनजिक असलेल्या लावणा शिवारात हा प्रकार दिसत असून, याबाबत महसूल विभागाचे कर्मचारी अनभिज्ञ असल्याचे दिसत आहे.मंगरुळपीर तालुक्यातील वाशिम-मंगरुळपीर, मंगरुळपीर-महान, मंगरुळपीर-कारंजा आणि मंगरुळपीर-महान अशी चार रस्त्यांची कामे राष्ट्रीय महामार्ग कंपनीच्यावतीने करण्यात येत आहेत. या कामांचे कंत्राट घेणाºया कंपन्यांनी विविध साहित्य, यंत्रसामग्री ठेवण्यासह वास्तव्यासाठी खासगी जमीन मालकांची जमीन करारावर दोन ते तीन वर्षांसाठी भाड्याने घेतली आहे. यात मानोरा-मंगरुळपीर मार्गाच्या कामाचे कंत्राट घेणाºया कंपनीचाही समावेश असून, त्यांनी मानोरा-मंगरुळपीर मार्गावर जोगलदरी ते साखरडोहदरम्यानच्या शिवारात तीन ते चार एकर जमीन भाडेतत्त्वावर दोन वर्षांसाठी घेतल्याची माहिती आहे. त्याशिवाय याच कंपनीने लावणा शिवारात साहित्य ठेवण्यासह कामगारांच्या वास्तव्यासाठी टिनशेड टाकून अतिक्रमण केले आहे. महसूल विभागाकडून या संदर्भात माहिती घेतली असता. अशा प्रकारच्या उपयोगासाठी परवानगी आवश्यक असल्याचे सांगण्यात आले; परंतु संबंधित कंपनीने तहसील कार्यालयातून परवानगी घेतली की नाही, त्याची कल्पना नसल्याचे तलाठ्याने सांगितले.
लावणा शिवारात ई-क्लास जमिनीवर कंत्राटदार कंपनीच्या अतिक्रमणाची माहिती नाही. त्यांनी तहसील कार्यालयातून परवानगी घेतली का, याची माहिती घेऊन वरिष्ठांच्या निर्देशानुसार कार्यवाही करण्यात येईल.-गजानन गोदमलेतलाठी, लावणा, चांधई,धानोरा (मंगरुळपीर)