वाशिम, दि. ३- स्तनदा मातांची गैरसोय होऊ नये म्हणून शासनाने प्रत्येक बसस्थानकावर हिरकणी कक्ष सुरू केले आहेत. मात्र, जिल्हय़ातील बसस्थानकामधील काही हिरकणी कक्ष कुलूप बंद राहत असल्याने व काही कक्षामध्ये जाळे, घाण साचून त्याची स्वच्छता होत नसल्याने स्तनदा मातांची गैरसोय होत आहे. लोकमतने ३ मार्च रोजी केलेल्या स्टिंग ऑपरेशनवरून अनेक धक्कादायक बाबी उघडकीस आल्या. स्तनदा मातांची गैरसोय होऊ नये म्हणून प्रत्येक बसस्थानकांत स्वतंत्र हिरकणी कक्ष सुरू करण्याचे निर्देश परिवहन विभागाने तीन वर्षांपूर्वीच दिलेले आहेत. या निर्देशानुसार वाशिम जिल्ह्यात अद्यापही काही ठिकाणी हिरकणी कक्ष सुरू नसल्याची तसेच काही ठिकाणी सदर कक्ष कुलूपबंद असल्याची माहिती ह्यलोकमतह्ण चमूला मिळाली होती. यावरून रिसोड, मंगरूळपीर, मालेगाव, वाशिम येथे शुक्रवार, ३ मार्च रोजी स्टिंग ऑपरेशन करण्यात आले. यावेळी मालेगाव बसस्थानकात अद्यापही हिरकणी कक्ष सुरू नसल्याचे दिसून आले. मालेगाव येथे आगार व्यवस्थापक नसल्याने याबाबत हिरकणी कक्षाची बाब कुणीही गांभीर्याने घेत नसल्याचे सांगितले जाते. रिसोड येथील बसस्थानकात अद्याप स्वतंत्र हिरकणी कक्ष सुरू करण्यात आला नसल्याचे दिसून आले. विद्यार्थी पासेस असलेल्या एका छोट्याशा खोलीलाच ह्यहिरकणी कक्षह्ण करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला. विशेष म्हणजे या खोलीच्या आसपास कुठेही ह्यहिरकणी कक्षह्ण असा उल्लेख असलेला फलक लावण्यात आला नाही. मंगरूळपीर येथील बसस्थानकातील हिरकणी कक्ष कुलूप बंद असल्याचे दिसून आले. वाशिमातही अशीच स्थिती आहे.असे केले स्टिंग ऑपरेशन..*हिरकणी कक्ष सुरू करण्यासंदर्भात तीन वर्षांंपूर्वी शासनाने आदेश दिलेले आहेत.*अद्यापही हिरकणी कक्ष व्यवस्थित सुरू नसल्याची माहिती मिळाल्यावरून शुक्रवारी स्टिंग करण्यात आले.*मालेगावात हिरकणी कक्षच सुरू झाला नसल्याचे दिसून आले.*रिसोड येथे हिरकणी कक्ष कुठे आहे, हेच कुणाला दिसत नाही. विद्यार्थी पासेसच्या एका खोलीत हा कक्ष असल्याचे सांगण्यात आले.
हिरकणी कक्ष कुलूप बंद!
By admin | Published: March 04, 2017 1:56 AM