लोकमत न्यूज नेटवर्कमालेगाव (वाशिम): मालेगावातील बरेच रस्ते अतिक्रमानाच्या विळख्यात अडकलेले आहेत . अकोला - हैद्राबाद रस्त्यावरील जुने बसस्थानक ,जुने बस स्थानकापासून माने हॉस्पिटलकडे जाणारा रस्ता यांच्यावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले आहे .मालेगाव शहरातील जूने बसस्थानक अकोला - हैदराबाद राज्य महामार्गावर असून तिथेच पोलीस ठाणे आहे , त्यामुळे या ठिकाणी नेहमी गर्दी असते . या परिसरातील उपहारगृहे व इतर व्यावसायिकांनी तात्पुरते टिनशेड उभारून अतिक्रमण केले आहे .तिथे फळ विक्रेत्यांनी तात्पुरती दुकाने थाटून अतिक्रमण केले आहे .याच ठिकाणी अवैध प्रवासी वाहतूक करणारी वाहने उभी असतात .त्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे . या रस्त्याची रुंदी वाहतुकीसाठी कमी झाली आहे . त्यामुळे या रस्त्याने चालणे व दुचाकी वाहन चालविणे कठीण झाले आहे.मालेगाव शहरातील मुख्य रस्त्यावर,मुख्य रस्ता ते आठवडी बाजार रस्त्यावर, तहसील कार्यालयासमोरील रस्त्यावर अतिक्रमण करण्यात आले आहे याकडे वरिष्ठांनी लक्ष देवून ते हटविण्याची मागणी केली आहे.
रस्ते अतिक्रमणाच्या विळख्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 04, 2017 7:46 PM
मालेगाव (वाशिम): मालेगावातील बरेच रस्ते अतिक्रमानाच्या विळख्यात अडकलेले आहेत . अकोला - हैद्राबाद रस्त्यावरील जुने बसस्थानक ,जुने बस स्थानकापासून माने हॉस्पिटलकडे जाणारा रस्ता यांच्यावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले आहे .
ठळक मुद्देमालेगाव येथील प्रकार संबधितांचे दुर्लक्ष