एक ते १९ वर्षे वयोगटातील किमान ६८ टक्के बालकांमध्ये आढळणारा आतड्याचा कृमीदोष हा मातीतून प्रसारित होणाऱ्या जंतूमुळे होतो. हाच कृमीदोष रक्तक्षय आणि कुपोषणाचे कारण ठरतो. त्यामुळे त्यांना जंतनाशक गोळी दिली जाते. कोरोना संसर्गामुळे अंगणवाडी, शाळा बंद असल्याने सर्व मुला-मुलींना अंगणवाडी सेविका व आशा सेविका यांच्याद्वारे जंतनाशक गोळी घरपोच देण्यात आली. कोरोनामुळे गोळी वाटप करताना कर्मचाऱ्यांची दमछाक झाली. लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : आतड्याचा कृमीदोष टाळण्यासाठी जिल्ह्यातील १ ते १९ वर्षे वयोगटातील मुला-मुलींना घरोघरी जाऊन जंतनाशक गोळ्यांचे वितरण करण्यात आले. दरम्यान, कोरोनामुळे जंतनाशक गोळी वितरीत करताना आरोग्य कर्मचाऱ्यांची चांगलीच दमछाक झाली.
एक ते १९ वर्षे वयोगटातील किमान ६८ टक्के बालकांमध्ये आढळणारा आतड्याचा कृमीदोष हा मातीतून प्रसारित होणाऱ्या जंतूमुळे होतो. हाच कृमीदोष रक्तक्षय आणि कुपोषणाचे कारण ठरतो. त्यामुळे त्यांना जंतनाशक गोळी दिली जाते. कोरोना संसर्गामुळे अंगणवाडी, शाळा बंद असल्याने सर्व मुला-मुलींना अंगणवाडी सेविका व आशा सेविका यांच्याद्वारे जंतनाशक गोळी घरपोच देण्यात आली. कोरोनामुळे गोळी वाटप करताना कर्मचाऱ्यांची दमछाक झाली.
०००
घरोघरी जाताना घेतली जातेय काळजी
अंगणवाडी सेविका, आशा स्वयंसेविकांमार्फत घरोघरी जाऊन जंतनाशक गोळी वाटप करताना खबरदारी घेण्यात आली. या कर्मचाऱ्यांना प्रशिक्षणही देण्यात आले. ज्यांना जंतनाशक गोळी मिळाली नाही, त्यांना ८ मार्च रोजी माॅपअप दिनी जंतनाशक गोळी दिली जाणार आहे.घरोघरी जाताना घेतली जातेय काळजी
अंगणवाडी सेविका, आशा स्वयंसेविकांमार्फत घरोघरी जाऊन जंतनाशक गोळी वाटप करताना खबरदारी घेण्यात आली. या कर्मचाऱ्यांना प्रशिक्षणही देण्यात आले. ज्यांना जंतनाशक गोळी मिळाली नाही, त्यांना ८ मार्च रोजी माॅपअप दिनी जंतनाशक गोळी दिली जाणार आहे.
००
१५०० कर्मचाऱ्यांची फौज
जिल्ह्यात १०५६ अंगणवाडी सेविका असून, ४०० च्या आसपास आशा स्वयंसेविका आहेत. अंगणवाडी सेविका आणि आशा स्वयंसेविकांच्या माध्यमातून १ ते १९ वर्ष वयोगटातील मुला-मुलींना जंतनाशक गोळ्यांचे वितरण घरपोच करण्यात आले आहे. १५०० कर्मचाऱ्यांची फौज
जिल्ह्यात १०५६ अंगणवाडी सेविका असून, ४०० च्या आसपास आशा स्वयंसेविका आहेत. अंगणवाडी सेविका आणि आशा स्वयंसेविकांच्या माध्यमातून १ ते १९ वर्ष वयोगटातील मुला-मुलींना जंतनाशक गोळ्यांचे वितरण घरपोच करण्यात आले आहे.
०००
जिल्ह्यात १ मार्च रोजी १ ते १९ वर्ष वयोगटातील मुला-मुलींना अंगणवाडी सेविका, आशा स्वयंसेविकांच्या माध्यमातून घरपोच जंतनाशक गोळ्यांचे वितरण करण्यात आले. ज्यांना या दिवशी गोळी मिळाली नाही, त्यांना ८ मार्च रोजी जंतनाशक गोळी देण्यात येईल.
- डॉ. अविनाश आहेर, जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्ह्यात १ मार्च रोजी १ ते १९ वर्ष वयोगटातील मुला-मुलींना अंगणवाडी सेविका, आशा स्वयंसेविकांच्या माध्यमातून घरपोच जंतनाशक गोळ्यांचे वितरण करण्यात आले. ज्यांना या दिवशी गोळी मिळाली नाही, त्यांना ८ मार्च रोजी जंतनाशक गोळी देण्यात येईल.
- डॉ. अविनाश आहेर, जिल्हा आरोग्य अधिकारी