वाशिम - इंदिरा आवास घरकुल योजनेंतर्गतचे जवळपास ९०० प्रस्ताव आॅनलाईन न झाल्याने संबंधित लाभार्थींच्या अनुदानाचा तिढा अद्याप कायम आहे.वाशिम जिल्ह्यात ग्रामीण भागात इंदिरा आवास घरकुल योजनेंतर्गत सन २०१५-१६ या सत्रात लाभार्थींकडून प्रस्ताव बोलाविले होते. ६५०० घरकुलांचे उद्दिष्ट असताना उद्दिष्टापेक्षा अधिक प्रस्ताव प्राप्त झाले. सर्व प्रस्ताव मंजूर झाल्याने लाभार्थींना अनुदान मिळण्याची अपेक्षा होती. मात्र, उद्दिष्टाएवढे प्रस्ताव आॅनलाईन झाल्याने आणि उर्वरीत प्रस्ताव आॅफलाईन राहिल्याने अनुदानाचा पेच निर्माण झाला. जवळपास ९०० लाभार्थींचे प्रस्ताव आॅफलाईन आहेत. या लाभार्थींनादेखील अनुदान मिळावे, यासाठी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेने शासनाकडे प्रस्ताव सादर केला आहे, अशी माहिती प्रकल्प संचालक के.एम. अहमद यांनी दिली.
घरकुल अनुदानाचा तिढा कायम !
By admin | Published: March 19, 2017 4:58 PM