शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीत महायुती अन् मविआला बंडखोरीची धास्ती; १९९५ ची पुनरावृत्ती होण्याची भीती
2
"मनोज जरांगे जिथे जिथे सभेला..."; लक्ष्मण हाकेंनी थोपटले दंड; विधानसभेचा प्लॅन काय?
3
जनताच न्याय करणार, मशाल धगधगणार; निवडणूक जाहीर होताच आदित्य ठाकरेंनी फुंकलं रणशिंग!
4
भारताच्या ५ विमानांना बॉम्बने उडवण्याच्या धमक्या, अयोध्येसह या ठिकाणी आपातकालीन लँडिंग, सुरक्षा यंत्रणा सतर्क  
5
'एक्झिट पोलमुळे मतदारांमध्ये गोंधळ अन् चुकीच्या अपेक्षा' निवडणूक आयुक्तांचा माध्यमांना सल्ला
6
निवडणुकीत 'पिपाणी' वाजणार, पण...; शरद पवार गटाच्या आक्षेपावर निवडणूक आयोगाची भूमिका
7
IND vs NZ : कसा आहे दोन्ही संघातील रेकॉर्ड? टीम इंडियाला नडण्याची ताकद किवींमध्ये कधीच नाही दिसली!
8
पाकिस्तानच्या कामरान गुलामचे अश्विनने केलं कौतुक, म्हणाला- "तो वादळात आला अन्..."
9
"निवडणूक एका टप्प्यात, आता ते सुद्धा एकाच टप्प्यात...", जयंत पाटलांचा महायुतीला टोला
10
…म्हणून अयोध्येतील मिल्कीपूर विधानसभेच्या पोटनिवडणुकीची झाली नाही घोषणा, समोर आलं असं कारण
11
Video: विराट कोहलीचा भन्नाट झेल! न्यूझीलंड विरूद्धच्या मालिकेआधी नेट प्रक्टिसमध्ये केली कमाल
12
70 हजार रुपयांपेक्षा स्वस्त असलेल्या बाईक आणि स्कूटर... दिवाळीपूर्वी खरेदी करण्याचा बेस्ट ऑप्शन!
13
रश्मी शुक्लांना निवडणूक आयोग हटवणार का?; निवडणूक आयुक्त राजीव कुमार म्हणाले...
14
पेजर हॅक केलं जाऊ शकतं, मग ईव्हीएम का नाही? मुख्य निवडणूक आयुक्त म्हणाले...
15
Maharashtra Vidhan Sabha Election Date: महाराष्ट्राच्या महासंग्रामाचा शंखनाद! विधानसभा निवडणूक एकाच टप्प्यात; २० नोव्हेंबरला मतदान, तर निकाल...
16
कोण होणार भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष?; निवडणुकीसाठी बनवली समिती, जाणून घ्या प्रक्रिया
17
"तुमचा सुपडा साफ केल्याशिवाय..."; फडणवीसांचं नाव घेत मनोज जरांगे काय बोलले?
18
या गंभीर आजाराने ग्रस्त आहे आलिया भट, खुद्द स्वतःच 'जिगरा' स्टारने केला खुलासा
19
Kamran Ghulam चा शतकी नजराणा! पदार्पणात असा पराक्रम करणारा पाकचा दुसरा वयस्क बॅटर
20
'इन्फ्लुएन्सर्स' हा नवा आजार आला आहे...अभिनेत्री सीमा पाहवा भडकल्या; ही कोणाची चूक?

‘होम क्वारंटाईन’ १५०० रुग्णांवर प्रशासनाचा ‘वॉच’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2021 4:42 AM

जिल्ह्यात ३ एप्रिल २०२० रोजी पहिला कोरोनाबाधित रुग्ण आढळला होता. पुढील ८ महिन्यांत, ३१ डिसेंबर २०२० अखेर बाधितांचा एकूण ...

जिल्ह्यात ३ एप्रिल २०२० रोजी पहिला कोरोनाबाधित रुग्ण आढळला होता. पुढील ८ महिन्यांत, ३१ डिसेंबर २०२० अखेर बाधितांचा एकूण आकडा ६ हजार ६६३ झाला. चालू वर्षी मात्र कोरोना रुग्णवाढीचे प्रमाण अत्यंत वेगवान असून, नव्या वर्षातील ८४ दिवसांतच (२५ मार्चअखेर) ७ हजार ३३१ रुग्णांची भर पडून एकूण बाधितांचा आकडा १३ हजार ९९४ वर पोहोचला आहे. त्यापैकी ११ हजार ७९० रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला; तर २५ मार्चअखेर २०२३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यातील ७५ टक्के अर्थात १५०० पेक्षा अधिक रुग्ण गृह विलगीकरणात ठेवण्यात आले आहेत. तसेच उर्वरित रुग्णांवर शासकीय व खासगी डेडिकेटेड कोविड हाॅस्पिटल, कोविड हेल्थ केअर सेंटरमध्ये उपचार सुरू आहेत.

दरम्यान, गृह विलगीकरणात असलेल्या नागरिकांवर ‘वाॅच’ ठेवण्याची जबाबदारी शहरी भागात नगरपालिका व ग्रामीण भागात ग्रामपंचायतींवर सोपविण्यात आलेली आहे. याशिवाय आशा, अंगणवाडी सेविकांनाही याकामी नियुक्त करण्यात आले आहे. ९ ते १४ दिवस गृह विलगीकरणातील व्यक्ती कोणाच्याही संपर्कात येऊ नये, त्यांनी ठरावीक काळात घराबाहेर पडून शहर, गावात फिरू नये यावर लक्ष ठेवण्यासाठी संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थांना विशेष परिश्रम घ्यावे लागत आहेत.

...............................

१३,९९४

कोरोनाबाधित एकूण रुग्ण

६,६६३

गतवर्षी २७२ दिवसांत आढळलेले रुग्ण

७,३३१

चालू वर्षी ८४ दिवसांत आढळलेले रुग्ण

२,०२३

२५ मार्चअखेर ‘ॲक्टिव्ह’ रुग्ण

............................

‘ॲक्टिव्ह’ कोरोना रुग्ण प्रथमच दोन हजारांवर

जिल्ह्यात कोरोनाचे संकट उद्भवल्याला २६ मार्च रोजी ३५७ दिवस पूर्ण झाले. इतक्या दिवसांत प्रथमच ‘ॲक्टिव्ह’ रुग्णांचा आकडा सध्या दोन हजारांवर पोहोचला आहे. यामुळे कोविड हेल्थ केअर सेंटर, डेडिकेटेड कोविड हाॅस्पिटलमधील बेड्स हाऊसफुल्ल झाले असून, अनेक रुग्णांना गृह विलगीकरणाचा सल्ला दिला जात असल्याची वस्तुस्थिती आहे.