वाशिम : आरटीई अंतर्गत घर ते शाळा यामधील अंतर लक्षात घेऊन मोफत प्रवेशासाठी बालकाची निवड केली जाते. मात्र, यामध्येही चुकीचा पत्ता दर्शवून शाळेपासून अधिक अंतरावर राहत असलेल्या बालकांनाही प्रवेश मिळाल्याचे तसेच शाळेच्या जवळच राहत असलेल्या बालकांना वेटिंगवर राहावे लागत असल्याचे प्रकार समोर येत आहेत.बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियमानुसार खासगी शाळांमध्ये एकूण प्रवेशाच्या २५ टक्के जागा मोफत प्रवेशासाठी राखीव ठेवण्यात येतात. मागासवर्गीय, आर्थिकदृष्ट्या दुर्बल व दिव्यांग गटातील बालकांना पहिल्या वर्गात २५ टक्के कोट्यातून प्रवेश देण्यासाठी चालू शैक्षणिक सत्रात प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. वाशिम जिल्ह्यातील १०३ शाळांमध्ये मोफत प्रवेशासाठी ७१८ जागा राखीव आहेत. ७ एप्रिल रोजी काढण्यात आलेल्या पहिल्या लॉटरी पद्धतीत १११९ अर्जांतून ६३० बालकांची निवड झाली. शाळांना पालकांना प्रवेशाकरिता पोर्टलवर तारीख द्यावी लागणार आहे. दरम्यान, शाळा ते घर यामधील अंतर लक्षात घेऊन कमी अंतर असलेल्या बालकांची प्राधान्यक्रमाने लॉटरी पद्धतीतून निवड होणे अपेक्षित आहे. मात्र, वाशिम शहरातील काही शाळांमध्ये अधिक अंतर असलेल्या बालकांची निवड झाली तर शाळेपासून कमी अंतर असलेल्या बालकांची नावे प्रतीक्षा यादीत असल्याचा प्रकार समोर येत आहे. ऑनलाइन अर्ज भरताना चुकीचा पत्ता दर्शविण्यात आल्याने हा घोळ निर्माण झाल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. शाळा व निवासस्थानादरम्यानच्या अंतराची पडताळणी व्हावी, अशी अपेक्षा प्रतीक्षा यादीत असलेल्या बालकांच्या पालकांमधून व्यक्त होत आहे.
अनलॉकच्या टप्प्यात मोफत प्रवेश प्रक्रिया सुरू होणार आहे. जिल्ह्यात आरटीई अंतर्गत १०३ शाळांची नोंदणी झाली आहे. शाळा व निवास स्थानादरम्यानच्या अंतराची पडताळणी करण्याच्या सूचना वरिष्ठांकडून प्राप्त झाल्या. त्यानुसार जिल्ह्यात या सूचनांची अंमलबजावणी केली जाईल.
- अंबादास मानकरशिक्षणाधिकारी (प्राथमिक) वाशि