कोणतेही सण, उत्सव, निवडणुकांमध्ये पोलिसांच्या बरोबरीने होमगार्ड कर्तव्य बजावतो. तपासणी यंत्रणेचा भाग सोडला तर बंदोबस्तावर १२ तासांपेक्षा अधिक पहारा देणाऱ्या जिल्ह्यातील होमगार्डबांधवांना मानधनही नियमित मिळणे अपेक्षित आहे. कोरोनाकाळात जिल्ह्यातील होमगार्ड्सला नियमित काम मिळाले. कोरोनाचा आलेख खाली आल्याने आणि सण, उत्सव, मिरवणुकीवर मर्यादा असल्याने होमगार्डस् फारसे काम उरले नाही. कोरोनाकाळात शासनाकडून होमगार्ड्सच्या कर्तव्याला नियमित मंजुरी दिली जात होती. आता केवळ सण, उत्सव व कायदा-सुव्यवस्थेचा मुद्दा उपस्थित झाला तरच होमगार्ड्सच्या सेवेला शासनाकडून मंजुरी मिळते. १ फेब्रुवारीपासून मंजुरी मिळालेली नाही. १९ फेब्रुवारील शिवजयंती असून, या दरम्यान दोन, तीन दिवसांसाठी होमगार्ड्सच्या सेवेला मंजुरी मिळणार असून, त्यांना बंदोबस्तासाठी बोलाविण्यात येणार आहे. वर्षांतील काही दिवसच काम मिळत असल्यामुळे अनेकजण पार्टटाईम इतर व्यवसाय करून कुटुंबांचा उदरनिर्वाह करत असल्याचे दिसून येते. सण, उत्सव, निवडणुकीदरम्यान कर्तव्य बजावल्यानंतरही जिल्ह्यातील अनेक होमगार्ड्स अद्याप मानधन मिळाले नाही.
०००००००००००
जिल्ह्यातील होमगार्ड - ५८२
सेवेला मंजुरी मिळाली नाही - १ फेब्रुवारीपासून
०००
कोट बॉक्स
शासनाकडून प्राप्त निधीमधून होमगार्डला मानधन अदा केले जाते. होमगार्ड्सच्या सेवेला दरमहा शासनाकडून मंजुरी मिळते. १९ फेब्रुवारीदरम्यान दोन, तीन दिवसांच्या बंदोबस्तासाठी होमगार्ड्सची सेवा घेण्याला मंजुरी मिळालेली आहे. शासनाकडून निधी प्राप्त होताच थकीत मानधन देण्यात येईल.
- विजयकुमार चव्हाण
जिल्हा समादेशक तथा अपर पोलीस अधीक्षक वाशिम
०००००
होमगार्डला नियमित काम मिळावे तसेच थकीत मानधनासाठी शासनाकडून लवकरात लवकर निधी मिळावा.
- अरुणराव सरनाईक
तालुका समादेशक, वाशिम