सर्व प्रथम मान्यवरांच्या हस्ते माता रमाई व ग्रामदैवत संत तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व हार अर्पण करण्यात आले. नंतर सरपंच व समस्त सदस्य आणि सरपंच धोटे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले असता गावच्या समृद्धीसाठी या कार्याची सुरुवात प्रत्येकांनी स्वतःपासून करण्यासाठी सर्वांनी समोर येण्याचे आव्हान केले. यानंतर महिलांची गावपातळीवर खूप मोठी शक्ती असून आपण सर्व समस्येला जबाबदार आहोत आणि आपणच त्या दूर करु शकतो पण सर्व सोबत येऊन या कार्याला हातभार लावल्यास तद्वतच प्रशासन तुमच्या सोबत आहे असे आवाहन विभागीय समन्वयक सुभाष नानवटे यांनी केले.
शेवटी कार्यक्रमाचे
मुख्य मार्गदर्शक म्हणून जिल्हा अधीक्षकांनी गावातील सर्व नागरिकांना विविध पीक पद्धतीच्या ऊर्जात्मक कार्याचा तथा महिला बचत गटांना मूलमंत्र देऊन आपण सर्वांनी हा मूलमंत्र कृतीत उतरविल्यास आपले गाव संपूर्ण समृद्ध करण्याची खात्री देत
त्यानंतर आर्थिक परिस्थितीती जेमतेम असूनही आपल्या गावाच्या समृद्धीसाठी प्रेरणादायी तथा उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांची दखल घेत कर्तबगार महिला म्हणून मोडले व वर्षाताई प्र.पडघान यांचा पुष्पगुच्छ व शाल भेट देऊन गौरव करत कौतुक केले.
यावेळी कार्यक्रमाला उपस्थित
सरपंच सुदर्शनभाऊ धोटे, नानोटे,मुख्याधापक गावंडे ,गावचे पो.पाटील भास्करराव धोटे,,हरिदासभाऊ परंडे ,महादेवराव परंडे,पांडुरंग गावंडे, भगत, मंगेश पाटील,महादेवराव धोटे, रामदास धोटे,मनोहरराव परंडे,सांगोळे साहेब,हिसेकर साहेब,ईंगोले साहेब ता समन्वयक सुभाष गवई
या कार्यक्रमासाठी ग्रामपंचायत कर्मचारी,छगन भोयर,उमेश पाचे ,रूषिकेश पडघान,दिलीप पडघान,गोपाल घुले आदीनी परिश्रम घेतले.