गत काही महिन्यांपासून मानधन मिळाले नसल्याने थकीत मानधन देण्यात यावे, आशांना १८ हजार रुपये आणि गटप्रवर्तकांना २१ हजार रुपये मानधन देऊन सेवेत कायमस्वरुपी सामावून घ्यावे, वाढीव मानधन तातडीने देण्यात यावे, माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेंतर्गत सर्वे केलेल्या कामाचा मोबदला आशा व गटप्रवर्तकांच्या बँक खात्यात तातडीने जमा करण्यात यावा, तक्रार निवारणासाठी तालुका आरोग्य अधिकाऱ्यांसोबत संघटनेची बैठक घेण्यात यावी, रुग्णांसमोर आशा स्वयंसेविकांना सन्मानाची वागणूक देण्यात यावी, प्रसुतीसाठी महिला रुग्णाला रुग्णालयात दाखल केल्यानंतर प्रसुती होईपर्यंत आशा स्वयंसेविका रुग्णालयात थांबणार नाहीत. सण, उत्सवादरम्यान सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे आशा स्वयंसेविकांनाही सुटी देण्यात यावी, आदी मागण्या आयटक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी निवेदनाद्वारे केल्या. आशांच्या मागण्यांचे निवेदन जिल्हा समूह संघटक अनिल उंदरे यांनादेखील ११ जानेवारीला वाशिम येथे देण्यात आले. यावेळी आयटक संघटनेचे राज्य उपाध्यक्ष मुगाजी बुरुड, तालुका समूह संघटक रंजना कराड, शेख नुरभाई, राहुल धमेरिया, विनोद गायकवाड, अश्विनी भोळसे यांची उपस्थिती होती.
विविध मागण्यांसाठी आशा, गटप्रवर्तक आक्रमक !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2021 4:33 AM