आरोग्य विभागातील शेवटचा घटक म्हणून जिल्ह्यात आशा, गटप्रवर्तक २००९ पासून काम करीत आहेत. मात्र, त्यांनी केलेल्या कामाचा योग्य मोबदला मिळत नसल्याने आशा व गटप्रवर्तकांमध्ये तीव्र असंतोष व्यक्त केला जात आहे. कोरोना महामारीचा गैरफायदा घेत या काळात आशा व गटप्रवर्तकांवर असंख्य कामे लादण्यात आलेली आहेत. जीव धोक्यात घालून ही सर्व कामे निमूटपणे करीत असताना आशांना पुरेशा संरक्षण सोयी-सुविधा उपलब्ध करून देणे तर सोडाच; परंतु योग्य मोबदलाही मिळत नसल्याचा आरोप आशा, गटप्रवर्तकांनी केला. याकडे शासन, प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी ३ जून रोजी मालेगाव तालुक्यातील आशा, गटप्रवर्तकांनी तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय गाठून निवेदन सादर केले. १४ जूनपर्यंत मागण्या मान्य न झाल्यास १५ जून रोजी एक दिवसीय लाक्षणिक संप तर १६ जूनपासून आशा गटप्रवर्तकांना नेमून दिलेल्या कामाव्यतिरिक्त इतर कोणतेही काम न करण्याचा पवित्रा आयटक संघटनेच्या वतीने घेण्यात आला.
आशा धडकल्या ‘टीएचओ’ कार्यालयात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 04, 2021 4:31 AM