कोंडोली येथील अंगणवाडी क्रमांक ३ मध्ये १७ सप्टेंबर रोजी आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच महाज्योती पवार, तर प्रमुख अतिथी म्हणून प्रवेशिका कांबळे, उपसरपंच गजानन राऊत, मनीष पवार उपस्थित होते. यावेळी मातोश्री सुभद्राबाई पाटील महाविद्यालयातील गृह अर्थशास्त्र विभागाच्या प्रमुख प्रा. नक्षिने व पर्यवेक्षिका दीपा कांबळे यांनी आहाराबद्दल मार्गदर्शन केले. कार्यक्रमात महिला बचतगटांनी रान भाज्या, फळे, सकस नाष्टा, आलिवचे लाडू, तांदळापासून बनविलेल्या पदार्थांचे प्रदर्शन आयोजित केले होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अंगणवाडी सेविका संतोषी तायडे, मदतनीस मंगला चव्हाण यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाला अंगणवाडी सेविका स्वाती देशमुख, अंगणवाडी सेविका सुनंदा खिराडे, मदतनीस दुर्गा डोंगरे, मदतनीस तारा मोरे, आरसीआय संगीता राऊत, अर्चना भगतसह महिला बचतगटाच्या अध्यक्षा, सदस्य महिलांची मोठी उपस्थिती होती. प्रास्ताविक अंगणवाडी सेविका बी. आर. डेरे यांनी केले तर आभारप्रदर्शन संतोषी तायडे यांनी केले.
गृहिणी तंदुरुस्त, तर संपूर्ण परिवार तंदुरुस्त!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2021 4:42 AM