शिखरचंद बागरेचा वाशिम, दि. १७: गत अनेक वर्षापासून पावसाळयातील अत्यल्प पावसामुळे नापिकी व कोरडया दुष्काळात होरपळून निघाल्यानंतर यावर्षी समाधानकारक पावसामुळे शेतकर्यांसह सर्वसामान्य नागरिक सुखावले. दुसरीकडे धान्य, किराणासह जिवनाश्यक वस्तुंचे भाव वधारल्याने गृहीणींचे बजेट मात्र पार कोलमडून गेले. यामुळे संसाराचा गाडा पुढे हाकण्यासाठी गृहीणींना चांगलीच कसरत करावी लागत आहे. महागाईच्या मुद्यावरून अडीच वर्षांंंपूर्वी राज्य व केंद्रात तत्कालिन काँग्रेस सरकारविरोधात विरोधकांनी तोफ डागली होती. महागाईवरून तत्कालिन राज्यकर्त्यांंंना विरोधकांनी सळो की पळो करून सोडले होते. त्यानंतर सत्तांतर होऊन महागाई कमी होईल, अशी अपेक्षा सर्वसामान्य जनतेला होती. मात्र, प्रत्यक्षात महागाई विक्रमाचा नवा टप्पा गाठत असल्याचे दिसून येत आहे. सध्या सणासुदीचे दिवस जवळ आले असून यामुळे बाजारात ग्राहकांची वर्दळ वाढली आहे. नेमके याच कालावधीत धान्य, किराणा सामान या जिवनाश्यक वस्तुंचे दर मागील काही महिन्यांच्या तुलनेत यावेळी वाढले असल्याचे दिसून येते. काही दिवसांपुर्वी ६0 रुपये प्रतिकिलो विकली जाणारी चना डाळीचे दर आता शंभर रुपयाच्यावर पोहोचले आहेत. पुर्वी साखरेचे ३२ रुपये प्रति किलो दर होते. आता ४0 रुपये प्रति किलो झाले आहेत. गूळ३0 रुपयावरुन ४५ रुपये किलोवर पोहोचला. तांदुळ ३0 रुपये किलोवरुन ५0 ते ५५ झाले आहेत. उडदाची डाळ १२0 रुपयावरुन १४0 रुपये किलो झाली आहे.१५ ते १८ रुपये किलो मिळणारा चांगला प्रतीच्या गव्हाचे दर २२ ते २६ रुपये किलो पर्यंंंत पोहोचले आहेत. २८ रुपये किलोने विकणारा रवा मैदा आता ३२ ते ३५ रुपयापर्यंंंत पोहोचला आहे. फराळासाठी लागणारे शेंगदाणे व साबुदान्याचे दर सुद्धा वाढले असून साबुदाना ५0 रुपयावरुन ६0 रुपये तर शेंगदाने ८५ रुपये किलोवरुन ११0 रुपये प्रति किेलो झाले आहेत. धान्य व किराणा सामानाचे दर वाढलेले आहेत. दुसरीकडे भाजीपाला स्वस्त झाल्यामुळे गृहीनींना काहीसा दिलासा मिळाला आहे. भाजीबाजारात फेरफटका मारला असता ८0 ते १00 रुपये विकले जाणारे टमाटे आता १0 ते २0 रुपये किलाने विक्री होत असल्याचे दिसून आले. शंभर रुपये किलोची भेंडी आता ३0 रुपयावर येवून ठेपली आहे. आलु व कांदयाचे दर सुद्धा ४0 रुपयापर्यंंंत खाली घसरले आहेत. एकंदरीत धान्य व किराणा सामानाचे दर वाढले असल्यामुळे घरसंसार चालविणार्या गृहीणींचे बजेट कोलमडले आहे.
*वस्तूचे नाव जुने दर नवीन दर हरबरा दाळ ६0 १0५उडद दाळ १२0 १४0उडद मोगर १४0 १६0तांदूळ ४४ ५४गुळ ३0 ४५साखर ३२ ४0साबुदाना ५0 ६0शेंगदाना ८५ ११0रवा/मैदा २८ ३२गहू १८-२0 २२-२६