वाशिम रेल्वेस्थानकावरून नरखेड-काचीगुडा इंटरसिटीसह हैद्राबाद-जयपूर, सिकंदराबाद-जयपूर, नांदेड-गंगानगर, नांदेड-जम्मूतावी आदी एक्सप्रेस रेल्वे सुरू झाल्या आहेत. अमरावती-तिरूपती ही रेल्वे त्यात विशेष रेल्वेच्या नावाखाली चालविण्यात येत आहे. त्याचे तिकीट दर तुलनेने अधिक आहेत.
....................................
या रेल्वे आहेत सुरू
तिरूपती-अमरावती
नरखेड-काचीगुडा
जम्मुतावी-नांदेड
सिकंदराबाद-जयपूर
नांदेड-गंगानगर
हैद्राबाद-जयपूर
.................................
प्रवासी म्हणतात...
अमरावतीवरून सुटणारी तथा वाशिममार्गे तिरूपती जात असलेल्या रेल्वेला प्रवाशांचा विशेष प्रतिसाद मिळतो. या माध्यमातून दरवर्षी तिरूपतीला दर्शनासाठी जाणे सोयीचे झाले आहे; मात्र गेल्या काही दिवसांपासून तिकीटदरात वाढ झाली असून ती आता मागे घ्यावी, अशी अपेक्षा आहे
- गजानन इंगोले
.......................
वाशिममार्गे धावत असलेल्या एक्सप्रेस रेल्वेचे तिकीट दर पूर्वीप्रमाणेच करण्यात आले आहेत; मात्र विशेष रेल्वेच्या नावाखाली सुरू असलेल्या अमरावती-तिरूपती एक्सप्रेसच्या दरातच कुठलीच घट करण्यात आलेली नाही. कोरोना काळ बहुतांशी संपल्याने तिकीट दर कमी करावे.
- अनिल अंभोरे
.........................
तिकिटात फरक किती?
पूर्वी वाशिमवरून तिरूपतीला रेल्वेने जायचे झाल्यास ५५० रुपये तिकीट लागायचे. कोरोना काळात या रेल्वेच्या तिकीट दरात वाढ झाली असून आता ७०० रुपये मोजावे लागत आहेत.
....................
आरक्षणाची सक्ती बंद करायला हवी
वाशिममार्गे तिरूपती-अमरावती या विशेष रेल्वेसह नरखेड-काचीगुडा, जम्मुतावी-नांदेड, सिकंदराबाद-जयपूर, नांदेड-गंगानगर, हैद्राबाद-जयपूर या रेल्वे सुरू आहेत. प्रवास करणाऱ्या प्रत्येकास आरक्षणाची सक्ती करण्यात आली आहे.
यामुळे ऐन वेळेवर प्रवास कराव्या लागणाऱ्यांना अडचणीचा सामना करावा लागतो. दरम्यान, कोरोनाचे संकट आता बहुतांशी निवळले असून तुलनेने धोका कमी झाला आहे. त्यामुळे आरक्षणाची सक्ती करू नये, असा सूर नागरिकांमधून उमटत आहे.