लोकमत न्युज नेटवर्कइंझोरी (वाशिम) : मानोरा तालुक्यातील इंझोरीसह परिसरातील शालेय विद्यार्थीनींच्या प्रवासासाठी कारंजा आगारातून धावणाºया मानव मिशनच्या बसफेरीचे वेळापत्रक आठवडाभरापूर्वीच अचानक बदलले आहे. शाळेची वेळ बदलण्यापूर्वीच ही फेरी सकाळी धावत असल्याने या बसने शैक्षणिक प्रवास करणाºया अनेक विद्यार्थीनींना शुक्रवार ६ मार्चपर्यंत खासगी वाहनाने खर्च करून प्रवास करावा लागला. विद्यार्थीनींचा शालेय प्रवास सुखकर व्हावा, त्यांच्यात शिक्षणाची गोडी निर्माण व्हावी म्हणून मानव विकास मिशन अंतर्गत एसटीच्या बसफेºया सुरू करण्यात आल्या आहेत. मानोरा ते कारंजा मार्गावरील विविध गावांत शिक्षण घेणाºया विद्यार्थीनींसाठीही कारंजा आगारातून मानव मिशनची एक बस सोडण्यात येते. उन्हाळ्याच्या दिवसांत रखरखत्या उन्हामुळे विद्यार्थ्यांना होणारा त्रास लक्षात घेऊन शाळांची दुपारची वेळ बदलून सकाळच्या वेळेत शाळा भरविण्यात येते. त्यानुसार मानव मिशनच्या वेळेतही बदल केला जातो; परंतु शुक्रवार ६ मार्चपर्यंतही शाळांची वेळ बदलण्यात आली नसतानाही आठवडाभरापूर्वीपासूनच कारंजा आगारातून सोडण्यात येणारी मानव मिशनची बस दुपारऐवजी सकाळी धावत आहे. त्यामुळे विद्यार्थीनींना या बसचा कोणताही फायदा झाला नाही. त्यांना खर्च करून खासगी वाहनाने शाळेत जावे लागले.
मानव मिशनच्या बसचे वेळापत्रक आठवडाभरापूर्वी बदलल्याचा आरोप चुकीचा आहे. एका शाळेकडून मागणी झाल्यानंतरही आम्ही ३ फेब्रुवारीपर्यंत पूर्वीच्याच वेळेत बसफेरी सोडत होतो. याबाबत शिक्षण विभागाचे अधिकृत पत्र प्राप्त झाल्यानंतर मात्र ३ फेब्रुवारीपासून सकाळी सुरू केली आहे.-मुकूंद न्हावकर, आगारप्रमुख, कारंजा