००
ऑनलाइन व्यवहार जपून करा !
वाशिम : ऑनलाइन व्यवहाराबाबत अनेक तक्रारी प्राप्त हाेत असल्याने, ऑनलाइन व्यवहार करताना सावधगिरी बाळगावी, असे आवाहन सायबर सेलतर्फे करण्यात आले आहे.
००
२९ वाहनांवर कारवाई
वाशिम : वाहनचालकांना मास्क लावणे बंधनकारक केले असतानाही गुरुवारी वाशिम-पुसद मार्गावर २९ चालक विनामास्क आढळून आले. पोलिसांनी त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली आहे.
००
मक्याऐवजी ज्वारी, गहू देण्याची मागणी
वाशिम : स्वस्त धान्य दुकानांत देण्यात येत असलेल्या मक्याऐवजी ज्वारी किंवा गहू देण्याची मागणी लाभार्थ्यांच्यावतीने गुरुवारी करण्यात आली. मक्यापासून लाभार्थ्यांना काेणताच फायदा हाेत नसल्याचे निवेदनात म्हटले आहे.
००
जिल्हाधिकारी कार्यालयात तपासणी
वाशिम: जिल्हाधिकारी कार्यालयात कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांची तपासणी करूनच आत प्रवेश दिला जात आहे. यासाठी प्रवेशद्वारावर कर्मचारी नियुक्त असून, अडीच महिन्यांत येथे जवळपास १० हजार लोकांची थर्मल स्क्रीनिंगने तपासणी करण्यात आली.
०००
काटा भागांत पाणीटंचाईच्या झळा
वाशिम : जिल्ह्यात उन्हाचा पारा वाढू लागला असताना काटा परिसरात पाणीटंचाईच्या झळा सुरू झाल्या आहेत. परिसरातील गावांत पाणीटंचाई जाणवत असल्याने ग्रामस्थांना पाण्यासाठी पायपीट करावी लागत असल्याचे चित्र आहे.