कोठारी गावतलावात जमला पाणीसाठा
कोठारी : यंदाच्या उन्हाळ्यात कोठारी गावाला लागून असलेला गावतलाव पूर्णत: कोरडा झाला होता. गेल्या काही दिवसांत झालेल्या पावसाने पाणीसाठा झाला असून सध्या जवळपास ५० टक्के पाणीसाठा असल्याची माहिती आहे.
रस्त्याच्या डागडुजीची मागणी
वाशिम: वाशिम ते पुसद महामार्गावरील जांभरूण जहॉगीर फाट्यानजीक मोठमोठे खड्डे पडून रस्त्याची चाळणी झाली आहे. त्यामुळे एखादवेळी मोठा अपघात घडून जीवित हानी होण्याची भीती आहे. त्यामुळे या रस्त्याची तात्पुरती डागडुजी करण्याची मागणी होत आहे.
बहुतांश गावात ‘रोहयो’ची कामे बंदच
वाशिम: जिल्ह्यात तीन लाखांहून अधिक जॉबकार्डधारक मजूर आहेत. या कामगारांसाठी रोहयोची कामे करण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले ; परंतु अद्यापही बहुतांश गावात ‘रोहयो’ची कामे सुरू नाहीत.