शिरपूर जैन, दि. २१- पत्नीच्या हत्येप्रकरणी गुन्हा दाखल असलेल्या पतीला शिरपूर पोलिसांनी २0 फेब्रुवारीला अटक केली. २१ फेब्रुवारीला आरोपीला न्यायालयात हजर केले असता, २३ फेब्रुवारीपर्यंत आरोपीस पोलीस कोठडी सुनावण्यात आली.३१ डिसेंबर २0१६ रोजी मनीषा किसन अंभोरे या विवाहितेला पती किसन अंभोरे याने अंगावर रॉकेल टाकून पेटवून दिले होते. जळालेल्या स्थितीत मनीषा अंभोरे हिला उपचारासाठी अकोला येथील सर्वोपचार रुग्णालयात हलविण्यात आले होते. उपचार सुरू असताना १३ जानेवारी २0१७ रोजी मनीषाचा मृत्यू झाला. मृत्यूपूर्व जबानीत मनीषाने पती किसन अंभोरे याने मारहाण करीत अंगावर रॉकेल टाकून पेटवून दिल्याची माहिती दिली होती. मृत्यूपूर्व जबानीवरून शिरपूर पोलिसांनी १७ फेब्रुवारी रोजी पती किसन अंभोरे विरुद्ध भादंवि कलम ३0२, ३२४, ५0६, नुसार गुन्हा दाखल केला. २0 फेब्रुवारी रोजी आरोपीस अटक करण्यात आली. मंगळवारी विद्यमान न्यायालयात हजर केले असता, २३ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले.
पत्नीच्या हत्येप्रकरणी पतीस अटक
By admin | Published: February 22, 2017 2:19 AM