लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : कोरोना विषाणू संसर्गाच्या कालावधीतही काही प्राथमिक आरोग्य केंद्रांसह रिसोड, कारंजासह ग्रामीण रुग्णालय परिसरात स्वच्छतेचा बोजवारा उडत आहे. रिसोड येथे तर जैव वैद्यकीय कचरा कुठेही फेकून दिला जात असल्याचेही १९ जुलै रोजी आढळून आले.कोरोना विषाणू संसर्गाच्या पृष्ठभूमीवर सर्वांनी स्वच्छता राखावी, फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करावे, परिसरात कुठेही केरकचरा टाकू नये असा सल्ला आरोग्य विभागातर्फे वारंवार दिला जातो. दुसरीकडे ग्रामीण भागात काही प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय परिसरात गाजर गवत वाढले असून, जैव वैद्यकीय कचरा कुठेही टाकून दिला जात असल्याचे दिसून येते.रिसोड : येथील ग्रामीण रुग्णालय परिसरात रविवारी पाहणी केली असून, सलाईन व अन्य जैव वैद्यकीय कचरा कुठेही टाकून दिला जात असल्याचे दिसून आले. गाजर गवतही वाढले असून, परिसरात केरकचऱ्याचे साम्राज्य आहे. त्यामुळे नागरिकांना यापासून कोणता बोध घ्यावा, असा प्रश्नही उपस्थित होत आहे. याकडे वरिष्ठांनी लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.कारंजा लाड : येथील उपजिल्हा रुग्णालय परिसरात जैव वैद्यकीय कचºयाची योग्य विल्हेवाट लावली जात आहे; परंतू केरकचरा, घाणीचे साम्राज्य आहे. कोरोना विषाणू संसर्गाच्या पृष्ठभूमीवर आरोग्य विभागाने सरकारी रुग्णालय परिसरात स्वच्छता ठेवणे अपेक्षीत आहे.
वाशिम येथील जिल्हा सामान्य रुग्णालय परिसर संपूर्णत: स्वच्छ ठेवला जात आहे. जैव वैद्यकीय कचºयाची नियमित विल्हेवाट लावली जात आहे. रिसोड ग्रामीण रुग्णालय परिसरातील जैव वैद्यकीय कचºयाची योग्य विल्हेवाट लावण्यासंदर्भात संबंधित कंत्राटदाराशी बोलणे झाले आहे. येत्या दोन दिवसात ही समस्या निकाली काढण्यात येईल.- डॉ. अंबादास सोनटक्केजिल्हा शल्य चिकित्सक, वाशिम