रिसोड येथील श्री शिवाजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाच्या सभागृहात १९ जून रोजी अमरावती विभागाचे शिक्षक आमदार ॲड. किरणराव सरनाईक यांच्या स्थानिक विकास निधीतून तालुक्यातील ४६ शाळांना शैक्षणिक साहित्य वाटपासाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी समता फाउंडेशन मुंबईचे अध्यक्ष पुरुषोत्तम अग्रवाल, तर प्रमुख अतिथी म्हणून शिवाजी शिक्षण संस्था वाशिमचे उपाध्यक्ष अरुणराव सरनाईक, सचिव भिकाजीराव नागरे, स्थानिक शाळा समिती सदस्य पंजाबराव देशमुख, जितेंद्रकुमार दलाल, संजयकुमार जिरवणकर, संस्थाचालक संघाचे जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब सोमटकर, लक्ष्मणराव कायंदे, देविदासराव नागरे, बबनराव गाडे, बी. टी. बिल्लारी, मुख्याध्यापक संघाचे प्रदेश सदस्य डिगांबरराव मवाळ, मुख्याध्यापक संघाचे जिल्हाध्यक्ष विनोदराव नरवाडे, अमरावती विभागीय शिक्षक संघाचे जिल्हा उपाध्यक्ष भगवानराव नागरे, माजी जिल्हा परिषद सदस्य स्वप्निल सरनाईक उपस्थित होते.
सर्वप्रथम उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून प्रतिमा पूजन करण्यात आले. त्यानंतर सर्व सन्माननीय अतिथींचा अमरावती विभागीय शिक्षक संघाच्या रिसोड तालुका कार्यकारणीच्या वतीने यथोचित सत्कार करण्यात आला, तसेच रिसोड शहरात समता फाउंडेशनचे पुरुषोत्तम अग्रवाल यांचा शिक्षक आमदार ॲड. किरणराव सरनाईक यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला. त्यानंतर स्थानिक विकास निधी अंतर्गत वाटप करण्यात येणाऱ्या साहित्याचे मंचावरील मान्यवरांच्या हस्ते तालुक्यातील ४६ शाळांना वाटप करण्यात आले. त्यामुळे आता तालुक्यातील अधिकांश शाळांत ग्रीन बोर्ड आपल्याला पाहायला मिळतील.
यावेळी शिक्षक आमदार ॲड. किरणराव सरनाईक यांनी समता फाउंडेशनचे अध्यक्ष पुरुषोत्तम अग्रवाल यांचे कार्य अतुलनीय असून, समाजातील प्रत्येक नागरिकाने त्यांच्या कार्याचा आदर्श घेऊन आपल्या परीने समाजसेवा करण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक रिसोड तालुका अमरावती विभागीय शिक्षक संघाचे अध्यक्ष सुधाकर कोल्हे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करून आभार एम. डी. शिंदे यांनी मान.