स्थानिक सुभाष चौक येथे छाेटेखानी कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी नगराध्यक्षा डॉ. गजाला खान यांनी जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून, नागरिकांनी मास्कचा नियमित वापर करावा. हात साबणाने धुवावे किंवा सॅनिटाईझ करावे, घरामध्ये स्टीमरचा वापर करावा किंवा नाक तोंडात वाफ घ्यावी. ४५ वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त वय असणाऱ्यांनी न भीता कोरोना लस / व्हॅक्सीन घ्यावी. व्हॅक्सीनबद्दल अफवांवर विश्वास ठेवू नये. कोरोना लस सुरक्षित आहे. कोविशिल्ड ही लस आपल्या महाराष्ट्राने पूर्ण जगाला दिली असून, त्याबाबत आपण अभिमान बाळगावा. महाराष्ट्राने इतकी मोठी कामगिरी केली असून, महाराष्ट्रातील काही अज्ञानी लोकांनी कोरोना व्हॅक्सीनबाबत अफवा पसरविणे खेदजनक आहे. सर्व दुकानदारांनी, दुकानात काम करणाऱ्या कामगारांनी कोरोना टेस्ट करून घ्यावी. त्याकरिता नगर परिषदेत टेस्टिंगची व्यवस्था करण्यात आली आहे. सरकार व नगर पालिका जनतेच्या सुरक्षेकरिता अहोरात्र झटत असून, नागरिकांनी शासन प्रशासनाला सहकार्य करावे. धार्मिक, सामाजिक संघटना यांनी कोरोना नियमांचे पालन करीत समोर येऊन कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी शासन प्रशासन, नगर पालिकेला सहकार्य करावे, असे आवाहन केले. यावेळी नगर परिषदेचे आरोग्य निरीक्षक राजेश संगत, ॲड. मारूफ खान व कर्मचारी उपस्थित होते.
पालिकेच्यावतीने ‘मीच माझा रक्षक’ उपक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 01, 2021 4:42 AM