लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : नगर परिषदेची कुठलीही परवानगी न घेता, ७ लाख ४ हजार ३७0 रुपयांचे शुल्क अदा न करता शहरातील जुन्या आययूडीपी कॉलनीमध्ये खोदकाम करून त्यात फायबर पाइप टाकणार्या मालाड येथील भारतीय एयरटेल सर्व्हिसेस लिमिटेड या कंपनीविरुद्ध २९ जानेवारीला रात्री उशिरा शहर पोलीस स्टेशनमध्ये विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले.शहरातील जुनी आययूडीपी कॉलनी परिसरातील सुरेश भंडारी, प्रा. पांडे, संजय काळबांडे यांच्या घरापासून किशोर रंधवे यांच्या घरापर्यंत भारतीय एअरटेल सर्व्हिसेस या कंपनीने विनापरवानगी खोदकाम करून त्यात फायबर पाइप टाकले व यायोगे शासकीय जमिनीवर अतिक्रमण केल्याची तक्रार नगरसेवक अँड. विनोद खंडेलवाल यांनी नगर परिषदेसह पोलिसात १६ जानेवारीला केली होती. यासाठी नगर परिषदेकडे ७ लाख ४ हजार ३७0 रुपयांचे शुल्क भरणे आवश्यक असताना त्याकडेही संबंधित कंपनीने टाळाटाळ केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले होते. दरम्यान, याप्रकरणी पोलीस हेड कॉन्स्टेबल नितीन काळे यांनी चौकशी करून तसा अहवाल २९ जानेवारीला शहर पोलीस स्टेशनमध्ये सादर केला. चौकशीत भारतीय एअरटेल सर्व्हिसेस या कंपनीने गैरकायदेशीर खोदकाम केल्याची बाब निष्पन्न झाल्याने सदर कंपनीचे ठेकेदार सागर मौर्य याच्याविरूद्ध कलम ४४७, २८७, ३३६, ४३१, ४२७ भादंविनुसार गुन्हे दाखल करण्यात आले.
गैरकायदेशीर खोदकाम क रणे भोवले : ‘भारतीय एअरटेल सर्व्हिसेस’विरुद्ध गुन्हे दाखल!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2018 1:20 AM
वाशिम : नगर परिषदेची कुठलीही परवानगी न घेता, ७ लाख ४ हजार ३७0 रुपयांचे शुल्क अदा न करता शहरातील जुन्या आययूडीपी कॉलनीमध्ये खोदकाम करून त्यात फायबर पाइप टाकणार्या मालाड येथील भारतीय एयरटेल सर्व्हिसेस लिमिटेड या कंपनीविरुद्ध २९ जानेवारीला रात्री उशिरा शहर पोलीस स्टेशनमध्ये विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले.
ठळक मुद्देनियमानुसार सात लाखांचे शुल्क भरण्यास टाळाटाळ