.................
वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्याची मागणी
मालेगाव : तालुक्याचे ठिकाण असलेल्या मालेगावला नगरपंचायतीचा दर्जा मिळाला. त्याअनुषंगाने आता शहरातील वाहतूक समस्येचा नव्याने विचार करून नियोजन करण्याची गरज निर्माण झाली आहे. दैनंदिन विस्कळीत होणारी वाहतूक सुरळीत करावी, अशी मागणी नागरिकांनी नगरपंचायतकडे निवेदनाव्दारे केली.
...............
आरोग्यविषयक योजनेची अंमलबजावणी व्हावी!
वाशिम : गोरगरीब रुग्णांना मोफत आरोग्य सेवेचा लाभ घेता यावा, शासनाने अंमलात आणलेल्या आरोग्यविषयक योजनांची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी व्हावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते योगेश उबाळे यांनी जिल्हा शल्यचिकित्सकांकडे सोमवारी निवेदनाव्दारे केली.
...................
वापराच्या तुलनेत अधिक वीज देयक; ग्राहक त्रस्त
शेलुबाजार : वापराच्या तुलनेत अधिक प्रमाणात विद्युत देयक येत असल्याने ग्राहक त्रस्त झाले आहेत. वापरावर आधारित योग्य वीज देयके दिली जावी, अशी मागणी ग्रामस्थांनी मंगळवारी महावितरणकडे केली.
...............
अवैध प्रवासी वाहतूक जोमात
मेडशी : मालेगाव-मेडशी, मालेगाव-वाशिम आदी मार्गावर अवैध प्रवासी वाहतूक मोठ्या प्रमाणात सुरू आहे. पोलिसांनी याप्रकरणी कारवाई करावी, अशी मागणी युवा सेनेच्यावतीने जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे करण्यात आली.