लोकमत न्यूज नेटवर्कमंगरुळपीर : गुरांची अवैधरीत्या वाहतूक केल्याप्रकरणी तालुक्यातील आसेगाव पोलिसांनी चार आरोपींविरूद्ध १६ मे रोजी विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले. यासह ३१ बैल आणि दोन ट्रक पोलिसांनी जप्त केले. आसेगाव पोलिसांनी याबाबत दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी पो.काँ. ज्ञानदेव उगले यांनी तक्रार दिली की, मिळालेल्या गुप्त माहितीवरून धानोरा फाटा येथे नाकाबंदी केली असता, मंगरुळपीरवरून वाशिमकडे जाणाऱ्या ट्रकमध्ये (क्र.एम.एच.४०- ७५१३) १४ बैल आणि (एम.पी.०७ एच.बी.१०४०) या क्रमांकाच्या ट्रकमध्ये १७ बैलांची अवैधरीत्या वाहतूक सुरू असल्याचे आढळले. याप्रकरणी आरोपी चालक शे. मुनताज शे. युसूफ (रा.वलगाव, जि.अमरावती), क्लिनर मो.साजीद मो.अकील (रा.कारंजा) व दुसरा चालक भानुदास टेकाम (रा.शिरपूर खडकी) व क्लिनर अ.कलाम शे.ख्वाजा (रा.आर्वी) अशा चार आरोपींविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. केला आहे. याप्रकरणी पुढील तपास ठाणेदार विनायक जाधव करीत आहेत.
गुरांची अवैध वाहतूक; चार आरोपींवर गुन्हा
By admin | Published: May 17, 2017 1:44 AM