लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : शेतकºयांच्या दृष्टीने अत्यंत महत्वपुर्ण आणि ऐतिहासिक योजना म्हणून गणल्या गेलेल्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र शेतकºयांच्या बँक खात्यात तीन टप्प्यात ठराविक रक्कम वर्ग केली जाणार आहे. मात्र, याअंतर्गत जिल्ह्यात १.१५ लाख शेतकरी पात्र ठरले असताना केवळ ६६९८ शेतकºयांच्याच खात्यात फेब्रूवारी २०१९ मध्ये पहिल्या हप्त्याची रक्कम जमा झाली असून गेल्या दोन महिन्यांपासून योजनेची अंमलबजावणी पूर्णत: ठप्प झाली आहे.प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा शुभारंभ प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उत्तर प्रदेशातील गोरखपूर येथे २४ फेब्रुवारी रोजी डिजीटल पद्धतीने करण्यात आला. दोन हेक्टरपर्यंत शेतजमीन असलेल्या वाशिम जिल्ह्यातील जवळपास १ लाख १५ हजार पात्र शेतकरी कुटूंबाना प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा लाभ मिळणार आहे. त्यापैकी पहिल्या टप्प्यात ६ हजार ६९८ शेतकºयांच्या बँक खात्यात फेब्रूवारी महिन्यात प्रत्येकी २ हजार रुपयांचा निधी जमा झाला. मात्र, त्यानंतर पहिल्या टप्प्यात जाहीर झालेली यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघाची निवडणूक आणि दुसºया टप्प्यातील अकोला लोकसभा मतदारसंघ निवडणूकीच्या कामकाजात प्रशासन गुंतल्याने किसान सन्मान निधी योजनेच्या अंमलबजावणीकडे पूर्णत: दुर्लक्ष झाले. परिणामी, वाशिम जिल्ह्यातील पात्र १.१५ लाख शेतकºयांपैकी १ लाख ८ हजार ३०२ शेतकºयांना पहिल्या हप्त्याच्या रकमेची प्रतीक्षा लागून आहे. याकडे प्रशासनाने लक्ष पुरवावे, अशी मागणी होत आहे.
किसान सन्मान योजनेची अंमलबजावणी दोन महिन्यांपासून ठप्प!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2019 3:40 PM