मालेगाव - ग्रामपंचायत कर्मचाºयांना यापुढे नियमित वेतन मिळावे, यासाठी आॅनलाईन पद्धतीने बँक खात्यात वेतनाची रक्कम जमा केली जाणार आहे. ग्रामविकास विभागाने दिलेल्या आदेश पंचायत समितीला प्राप्त झाले असून, त्या अनुषंगाने आता ग्रामपंचायत कर्मचाºयांची माहिती संकलित केली जाणार आहे.
ग्रामपंचायत कर्मचाºयांना नियमित वेतन मिळत नाही. यासंदर्भात ग्रामपंचायत कर्मचाºयांच्या विविध संघटनांनी शासनस्तरावर पाठपुरावाही केला होता. शासनस्तरावर सकारात्मक विचार झाल्याने ग्रामविकास विभागाने यापुढे ग्रामपंचायत कर्मचाºयांना आॅनलाईन पद्धतीने बँक खात्यात वेतन जमा करण्याचा निर्णय घेतला. यासंदर्भात ग्रामविकास विभागाने जारी केलेले आदेश मालेगाव पंचायत समितीला प्राप्त झाले आहेत. मालेगाव तालुक्यात एकूण १२५ ग्रामपंचायत कर्मचारी कार्यरत आहेत. ५० टक्के वेतन सरकार तर ५० टक्के वेतन ग्रामपंचायतच्यावतीने दिले जाणार आहे. या कर्मचाºयांची इत्यंभूत माहिती, आधार कार्ड संलग्नित बँक खाते क्रमांक संकलित केले जाणार आहेत. ही जबाबदारी संबंधित ग्रामसेवकांवर सोपविण्यात आली आहे. दरम्यान, या निर्णयाचे मालेगाव तालुक्यातील ग्रामपंचायत कर्मचाºयांनी स्वागत केले असून, मंगळवारी एक बैठक घेऊन चर्चा करण्यात आली. ग्रामपंचायत कर्मचाºयांच्या बैठकीत विविध विषयांवर चर्चा झाली. वेतनाला आॅनलाईनची जोड मिळाल्यानंतर महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत वेतन मिळावे, अशी अपेक्षा कर्मचाºयांनी व्यक्त केली. संघटनेचे राज्य अध्यक्ष विलास कुमरवार, राज्य सरचिटणीस गिरीश दाभाळकर, राज्य उपाध्यक्ष सपना गावंडे, धनराज आंबटकर, जिल्हाध्यक्ष भारत ड़ोंगरे, जिल्हा सचिव विनोद देशमुख, जिल्हा उपाध्यक्ष गजानन लांडगे, ग्रां प.कर्मचारी संघटनेचे मालेगाव तालुका कार्यकारिणी अध्यक्ष संजय नखाते, सचिव प्रमोद जयसिंगराव सांगळे, कोषाध्यक्ष गजानन भीलंग, राजू कदम, जावेद शेख उस्मान, उल्हास राठोड, राजू भिवरकर, महाविर बेलोकार, ज्ञानबा वैरागडे, शेषराव नवल, मुकेश चव्हाण, दत्ता खेडकर, बालाजी चव्हाण आदींनी आॅनलाईन वेतनाचा हा निर्णय स्तुत्य असल्याचे म्हटले.